ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी शिवथाळीची जबाबदारी भुजबळांकडे, 26 जानेवारीला शुभारंभ

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ येत्या 26 जानेवारी 2020 रोजी होणार (shiv bhojan thali scheme start from 26 jan) आहे.

ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी शिवथाळीची जबाबदारी भुजबळांकडे, 26 जानेवारीला शुभारंभ
शिवभोजन थाळी
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 7:35 AM

मुंबई : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ येत्या 26 जानेवारी 2020 रोजी होणार (shiv bhojan thali scheme start from 26 jan) आहे. अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची माहिती दिली.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक‍ीदरम्यान त्यांनी याबाबतची माहिती दिली. शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात आणि 1 वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपयाला देण्यात येईल.

या विभागातंर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरणव्यवस्थेचे सक्षमीकरण करुन वाजवी दरात आवश्यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करुन देणार आहे. सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधुनिक व सक्षम करणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेत, महिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करणार आहे.

NFSAमध्ये अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति महिना 35 किलो धान्य आणि पीएचएच / एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना प्रती महिना 5 किलो प्रती व्यक्ती धान्य दिले जात आहे. याव्यतिरिक्त, शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे, विद्यार्थी वसतिगृहे,आश्रम शाळा, बालगृहे आणि कल्याणकारी संस्था यांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा केला जाईल. हे उपक्रम अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली (shiv bhojan thali scheme start from 26 jan) जाईल.

दरम्यान भुजबळ यांनी रास्त भावधान्य दुकानदारांचे सक्षमीकरण, संगणीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्थेद्वारे केरोसीन वितरण, सुधारीत धान्य वितरण प्रणाली, पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT), कल्याणकारी संस्था व वसतीगृह योजना, गोदाम व्यवस्थापन, तांदुळ फोर्टीफीकेशन, शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा, भविष्यातील विभागाची वाटचाल, वैधमापन शास्त्र विभाग व ग्राहक संरक्षण विभागाची माहिती, विभागातील रिक्त पदांचा आढावा (shiv bhojan thali scheme start from 26 jan) घेतला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.