बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, आजही मुंबईकरांचे हाल

मुंबई : विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजही प्रवासा दरम्यान समस्या उद्भवणार आहेत. मंगळवारी मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन कामगार संघटनांच्या बैठकांमधून काहीही तोडगा निघला नाही. त्यामुळे आज दुसऱ्याही दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू असणार आहे. तर शिवसेनेनं मात्र या संपातून काढता पाय घेतल्याने संपात फूट पडल्याचं चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळी आयुक्त अजॉय […]

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, आजही मुंबईकरांचे हाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजही प्रवासा दरम्यान समस्या उद्भवणार आहेत. मंगळवारी मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन कामगार संघटनांच्या बैठकांमधून काहीही तोडगा निघला नाही. त्यामुळे आज दुसऱ्याही दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू असणार आहे. तर शिवसेनेनं मात्र या संपातून काढता पाय घेतल्याने संपात फूट पडल्याचं चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळी आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी चर्चेनंतर शिवसेनेने संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतला. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याने 500 बसगाड्या रस्त्यावर उतरविणार, असा दावा शिवसेना नेत्यांनी काल केला होता.

LIVE UPDATE :

-मुलुंड बस डेपोमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर हजर राहणार नासल्याची कामगारांची भूमिका

-आज पहाटे पासून अंधेरी बस स्थानकात एकही बस आली नाही, प्रवासी त्रस्त

-500 बस सोडण्याचा शिवसेनेचा दावा फोल ठरला, प्रत्यक्षात रस्त्यावर एकही बस नाही

-बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर हार्बर आणि मध्य रेल्वेवर जास्तीच्या लोकल सोडण्यात येतील

– बेस्टच्या संपामुळे रेल्वे जास्तीच्या लोकल चालवणार

-आजही बेस्ट कामगारांचा संप सुरु, प्रवाशांचे मात्र हाल

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

– ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे. – 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी. – एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी. – 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा. – कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा. – अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

का पुकारावा लागला संप?

लोकल वगळता मुंबईची आणखी एक लाईफ लाईन म्हणजे बेस्ट आहे. गेली अनेक वर्ष बेस्ट कर्मचारी आपल्या मागण्या प्रशासनापुढे मांडत आले आहेत. मात्र, पालिकेकडून नेहमी आश्वासनं मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बेस्ट कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं, ते ही पूर्ण केलं नाही, त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे.

दोन दशकांपासून आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाची परिस्थिती नाजूक आहे. वेतनाची अनिश्चिती, कामगार सवलती आणि भत्त्यांमध्ये कपात अशा अनेक कारणांमुळे बेस्टच्या कामगारांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला आहे, याला सेनेच्या युनियनेही पाठिंबा दिला आहे.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.