PM Kisan: लवकरच 1.6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये, अर्जात त्रुटी असेल तर काय कराल?

| Updated on: Jan 27, 2021 | 7:14 AM

1.6 कोटी वंचित शेतकऱ्यांच्याही खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी सरकारने हालचाल सुरु केली आहे. (pm kisan samman nidhi)

PM Kisan: लवकरच 1.6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये, अर्जात त्रुटी असेल तर काय कराल?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan) आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा सातवा हप्ता पोहोचला आहे. 1.6 कोटी शेतकरी अजूनही बाकी आहेत. मात्र, या वंचित शेतकऱ्यांच्याही खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी सरकारने हालचाल सुरु केली आहे. वंचित 1.6 कोटी शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी जोडलेले आहे, त्यांना लवकरच सातवा हप्ता मिळणार आहे. (1.6 crore farmers will get 2000 rupees under the scheme of pm kisan samman nidhi)

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan) देशातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये देण्यात येतात. प्रत्येक हप्त्याला 2 हजार रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जातात. या योजनेंतर्गत मार्च 2021 पर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा करण्याचे नवे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.

तुमचे नाव कसे चेक कराल?

बँकेच्या खात्याशी आधारकार्ड लिंक नसल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे 1.6 कोटी शेतकऱ्यांना अजूनही सातवा हप्ता मिळालेला नाही. असे होऊ नये म्हणून सरकारने शेतकऱ्यांना आपल्या अर्जात काही त्रुटी आहेत का?, तसेच आपले नाव या योजनेच्या लाभार्त्यांमध्ये आहे का?, हे पडताळण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर मेन्यू बारमधील ‘फार्मर्स कॉर्नर’वर क्लिक केल्यानंतर तिथे शेतकऱ्यांना त्यांचे नाव तपासून पाहता येते. फार्मर्स कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांना आपले राज्य, जिल्हा, तसेच गावाची माहिती टाकल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे नाव तपासून पाहता येईल.

 

संबंधित बातम्या :

PM-Kisan Scheme: शेतकऱ्यांना मोफत मिळणार 36,000 रुपयांच्या योजनेचा लाभ, अशी करा नोंदणी

कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?

(1.6 crore farmers will get 2000 rupees under the scheme of pm kisan samman nidhi)