PFI : 15 राज्यात 100 ठिकाणी छापे, 45 जणांना अटक

| Updated on: Sep 22, 2022 | 9:06 PM

दिवसभर चौकशी केल्यानंतर दुपारी या पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पाच जणांना आठ दिवसांची कोठडी सुनावली.

PFI : 15 राज्यात 100 ठिकाणी छापे, 45 जणांना अटक
Follow us on

राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयए आणि ईडीनं स्थानिक पोलिसांसोबत गुरुवारी 15 राज्यात पीएफआयच्या सुमारे 100 ठिकाणी छापे टाकले. यात एनआयएने संपूर्ण संघटनेच्या 45 जणांना अटक केली. तामिळनाडू आणि केरळमध्ये पीएफआय या संघटनेचा पाया आहे. 19 आरोपींना केरळवरून, तर 11 आरोपींना तामिळनाडू, तर कर्नाटकमधून 7, आंध्र प्रदेशातून 2, युपी आणि तेलंगणातून 1 अशा लोकांना अटक केली.

दिल्लीच्या पटीयाला हाऊस कोर्टात 18 आरोपींची सुनावणी झाली. कोर्टानं सर्वांना चार दिवसांसाठी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. एनआयएचे 300 पेक्षा जास्त कर्मचारी छाप्यात सहभागी होते.

पापूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पाच संशयितांना नांदेडच्या सत्र न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी सुनावली. काल मध्यरात्री नांदेड आणि परभणी येथील एटीएसने पाच जणांना ताब्यात घेतले होते. नांदेडमधून पीएफआयचा राज्य सचिव मेराज अन्सारी, परभणी येथून अब्दुल सलाम, महोमद निसार, महोमद जाविद आणि अब्दुल करीम यांना ताब्यात घेतले होते.

दिवसभर चौकशी केल्यानंतर दुपारी या पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पाच जणांना आठ दिवसांची कोठडी सुनावली. नांदेडचा आणखी एक संशयित फरार असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. देश विघातक कृत्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे, केंद्राच्या कायद्याचा विरोध करणे असे आरोप या पाच जणांवर आहे.

दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्याचा कोणताही पुरावा एटीएसने सादर केला नसल्याचे आरोपीच्या वकिलांने सांगितले . पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांचा देश विघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. ती माहिती आम्ही पडताळून पाहिली असता खरी माहिती असल्याचे लक्षात आलं.

त्यानंतर महाराष्ट्रातून आम्ही 20 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. याबाबतीत औरंगाबाद, नांदेड, नाशिक आणि पुणे या अशा ठिकाणी मिळून चार गुन्हे दाखल करण्यात आलेली आहेत, अशी माहिती एटीएसचे औरंगाबाद अधीक्षक संदीप पालवे यांनी दिली आहे.