या नवऱ्याने या प्रथेला फाटा देत वधूच्या वडिलांना 11 लाख केले परत; या लग्नाचा होता आहे बोलबाला…

| Updated on: Feb 21, 2023 | 11:37 PM

ज्यामध्ये वराच्या बाजूच्या लोकांनी वधूच्या वडिलांनी दिलेले 11 लाख 51 हजार रुपये वधूच्या वडिलांना परत करण्यात आले आहेत.

या नवऱ्याने या प्रथेला फाटा देत वधूच्या वडिलांना 11 लाख केले परत; या लग्नाचा होता आहे बोलबाला...
Follow us on

नवी दिल्लीः सध्याच्या काळात लग्नाचे अनेक वेगवेगळे किस्से सांगितले जातात. ते कधी वाईट असतात तर कधी त्याचं कौतूक करावे इतके चांगले असतात. अशाच एका लग्नाची चांगल गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. राजपूत समाजातील एका वराने आपल्या लग्नात दिलेले 11 लाख 51 हजार रुपये वधूच्या कुटुंबीयाना परत करत फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन समाजाला एक नवी दिशा दिली आहे. त्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

देगाणा (नागौर) राजपूत समाजातील एका वराने आपल्या लग्नात दिलेले 11 लाख 51 हजार रुपये वधूच्या कुटुंबीयाना ते त्यांना परत दिले आहेत.

तर वधूच्या घराच्यांचा मान ठेवला जावा म्हणून त्यांच्या बाजूने एक रुपया आणि नारळ घेऊन राजपूत समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ही घटना घडली आहे सीकर जिल्ह्यातील नरसिंगपुरी गावातील. त्या ठिकाणी घडलेल्या लग्नाच्या या गोष्टीची चर्चा प्रचंड झाली आहे.

ज्यामध्ये वराच्या बाजूच्या लोकांनी वधूच्या वडिलांनी दिलेले 11 लाख 51 हजार रुपये वधूच्या वडिलांना परत करण्यात आले आहेत. त्याने फक्त एक रुपया आणि एक नारळ शगुन म्हणून तेवढाच घेतला आहे. .

देगना तालुक्यामधील जलसू कलान येथील रहिवासी असलेल्या कुंदनसिंग जोधा यांचा विवाह सीकर जिल्ह्यातील नरसिंगपुरी गावात राहणाऱ्या निकिता कंवरसोबत 17 फेब्रुवारी झाला होता.

त्यानंतर कुंदन सिंहने सांगितले की, मला हुंडा नको आहे, फक्त पत्नी म्हणून मी निकिताचा स्वीकार करत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजपूत समाजातील लोकांसह सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक आणि स्वागत केले.