Project Cheetah पुढच्या महिन्यात भारतात आणखी 12 चित्त्यांची एन्ट्री होणार,

नामिबियाहून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष बोईंग 747-400 या विमानाने मध्यप्रदेशच्या ग्वालेर येथे चित्ते दाखल झाले होते, त्यातील शाशा नावाची मादी चित्ता किडनीच्या आजाराने त्रस्त झाली असताना आणखी एक डझन चित्ते येत आहेत.

Project Cheetah पुढच्या महिन्यात भारतात आणखी 12 चित्त्यांची एन्ट्री होणार,
CHEETAH
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 27, 2023 | 11:16 AM

केपटाऊन : गेल्यावर्षी भारतात चित्त्यांचे आगमन झाले होते. आता आणखी काही चित्यांची (Cheetah ) भारतात एन्ट्री होणार आहे. यासाठी भारताने दक्षिण आफ्रीकेशी ( South Africa ) एक करार केला आहे. पुढील दिवसात भारतातील विविध संरक्षित जंगलात तुम्हाला या शानदार आणि रुबाबदार प्राण्याला पाहायला मिळणार आहे. कारण आफ्रिकन चित्त्यांची डझनभर ऑर्डरच भारताने दक्षिण आफ्रिकेला दिली आहे. गेल्याच वर्षी दक्षिण आफ्रीकेच्या शेजारील देश नामिबियातून चित्ते आणण्यात आले आहेत.

नामिबियाहून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष बोईंग 747-400 या विमानाने मध्यप्रदेशच्या ग्वालेर येथे चित्ते दाखल झाले होते. नामिबियाची राजधानी विंडहॉक येथून 8 चित्ते आणण्यात आले होते यात आठ चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत.  2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने नामिबियातून चित्ता आणण्यास ग्रीन सिग्नल दिला होता. सध्या या चित्ता प्रोजेक्टसाठी सरकारने 91 कोटींचे बजेट ठेवले आहे.

भारतातून चिता हा प्राणी सुमारे सत्तर वर्षांपूर्वीच नष्ट झाला आहे. पहिल्यांदाच जंगली चित्त्यांनी अशाप्रकारे एका खंडातून दुसऱ्या खंडात एन्ट्री केली होती. रेडीओ कॉलर लावलेल्या आठ चित्त्यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. 12 चित्त्यांची पहीली तुकडी फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात पाठवण्यात येणार असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. पुढील आठ ते 10 वर्षांसाठी दरवर्षी आणखी 12 चित्त्यांची भारतात पाठवणूक करण्याची योजना आहे,”असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्यावर्षी नामिबियाहून विमानाने दाखल झालेल्या या चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सुविधा उभारण्यात आली आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे.