AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 24 तास धोक्याची, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यातील तापमान…

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील 24 तास तापमान नक्की कसे असणार हे जाणून घ्या.

पुढील 24 तास धोक्याची, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यातील तापमान...
Indian weather
| Updated on: Feb 17, 2026 | 7:27 AM
Share

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. मध्ये कधी पाऊसही होतो. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यामध्येच आता फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. दुपारी कडक उन्हाळा जाणवत आहे. फक्त डिसेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी पडली. नोव्हेंबर महिन्यातही पाऊस सुरू होता. उत्तरेकडील काही राज्यात अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील अनेक भागात म्हणावी तशी थंडी यंदा पडली नाही. मात्र, वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील हवा घातक बनली. मुंबईमध्ये अजूनही वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यादरम्यानच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मोठा इशारा दिला. कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा वाढणार आहेत.

उन्हाच्या झळा वाढण्याची शक्यता असतानाच कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. देशातील नीचांकी तापमानाची नोंद पंजाबच्या भटिंडा येथे झाली. भटिंडा येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून निफाड येथे 11.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

पुढील काही दिवसात उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. राज्यात जरी उन्ह वाढत असले तरीही काही राज्यात अजूनही थंडी आणि पाऊस कायम आहे. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. सध्याचा उन्हाळा बघता राज्यात पुढील काही दिवस उन्हाचे चटके अधिक बसणार हे स्पष्टच आहे.

भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच सांगितले होते की, फेब्रुवारी महिन्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. त्याप्रमाणे सध्या तापमानात चढउतार सुरू आहे. मध्येच कडाक्याची थंडी सकाळच्या वेळी पडते तर दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ होईल.

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल