AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाने भारताला दिला अत्यंत मोठा धोका, चीनसोबत हातमिळवणी करून थेट…

अमेरिकेने भारतावर लावलेल्या निर्बंधांचा थेट फायदा चीनने घेतला. भारतावरील टॅरिफ अमेरिकेने कमी केला ही वस्तूस्थिती आहे. पण भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केली पाहिजे ही अट कायम ठेवण्यात आली. आता त्याचाच फटका भारताला बसतोय.

रशियाने भारताला दिला अत्यंत मोठा धोका, चीनसोबत हातमिळवणी करून थेट...
China india Russia
| Updated on: Feb 17, 2026 | 7:55 AM
Share

मागील काही दिवस भारत आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण बघायला मिळाले. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अनेक निर्बंध लादण्यात आली. जगातील मोठ्या टॅरिफपैकी एक भारतावर लावण्यात आला. अमेरिकेने भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान भारत आणि अमेरिकेत व्यापार करार सुरू होते. भारतानेही स्पष्ट केले की, जोपर्यंत टॅरिफ कमी होणार नाही, तोपर्यंत व्यापार चर्चा पुढे जाऊ शकणार नाही. आता भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार पूर्ण झाले असून तांत्रित बाबींवर काम केले जात आहे. मार्च महिन्यात सर्वकाही फायनल होईल. भारतासोबत व्यापार करार पूर्ण होताच अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करून 18 टक्के ठेवला आहे. ही अचानक घोषणा करण्यात आली. मात्र, अमेरिकेकडून वारंवार दावा केला जात आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली आहे आणि भविष्यातही भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणारा दुसऱ्या नंबरचा मोठा खरेदीदार होता. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे भारताने मोठ्या प्रमाणात तेल खरेदी कमी केले. यादरम्यान परिस्थितीचा फायदा घेत चीनने रशियासोबत जवळीकता अधिक वाढवली आणि मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी सुरू केली. भारत आणि रशियाचे संबंध अनेक वर्षांपासून चांगले आहेत. मात्र, आता चीनसोबत रशियाची जवळीकता वाढत आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांंनंतर रशिया अडचणीत सापडला असून चीन मदत करत आहे. मात्र, हा भारतासाठी नक्कीच अत्यंत मोठा धोका ठरणार आहे. आकडेवारीवरून असे स्पष्ट दिसून येते की, चीनने रशियाकडे तेलाच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्या आहेत की, फेब्रुवारी महिन्यात रशियन तेलाची आयात एक नवा विक्रम तयार करेल. गेल्या तीन महिन्यांपासून रशियाकडून मोठ्या प्रमाणात चीन तेल आयात करत आहे.

अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदीवर भारतावर अनेक निर्बंध लादली आहेत. मात्र, चीनला मैदान मोकळे करून दिले. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतावर मोठा टॅरिफ लावला त्यानंतर तो टॅरिफ काढण्यात आला, यासोबतच व्यापार करार करण्यात आली. रशियाच्या तेल खरेदीवर भारताने अगोदरच आपली भूमिका स्पष्ट केली असून भारताने म्हटले आहे की, आम्ही आमचे ऊर्जेचे स्त्रोत पूर्ण करण्यासाठी कोणाकडूनही तेल खरेदी करू शकतो.

Follow Us
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं