महाकुंभमध्ये 13 वर्षीय गौरी बनली साध्वी, 10 महिन्यामध्ये घरी परतली… कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. १० महिन्यांपूर्वी 13 वर्षीय मुलगी तिच्या नातेवाईकांनी जूना अखाड्याला दान केली आहे. आता ही मुलगी घरी परतली आहे. तिने धक्कादायक खुलासा केला आहे.

महाकुंभमध्ये 13 वर्षीय गौरी बनली साध्वी, 10 महिन्यामध्ये घरी परतली... कुटुंबियांनी केले गंभीर आरोप
Sadhvi Gauri
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 17, 2025 | 1:35 PM

यंदा प्रयागराजमध्ये महाकुंभादरम्यान आग्र्याची 13 वर्षीय एक मुलगी संन्यास घेऊन साध्वी गौरी बनली होती. घरच्यांनी जूना अखाड्याच्या महंत कौशल गिरीला अल्पवयीन मुलगी दान केली होती. हे प्रकरण समोर येताच सर्वत्र खळबळ माजली होती. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. जूना अखाड्याने महंत कौशल गिरीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर साध्वी गौरीला आग्र्याच्या नारी निकेतनमध्ये आणून ठेवण्यात आले होते. सुमारे १० महिन्यांनंतर ही साध्वी पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या कुटुंबियांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

मुलीला काही दिवसांपूर्वी नारी निकेतनमधून कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले होते. पण ती पुन्हा आपल्या गुरूकडे हरियाणाला निघून गेली. 13 नोव्हेंबरला आग्रा पोलिस हरियाणात पोहोचले आणि अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन आले. तिचे समुपदेशन करण्यात आले आणि पुन्हा एकदा नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. आता या मुलीने धक्कादायक माहिती दिली आहे. तिने सांगितले की ती अभ्यास करून आयुष्यात काही तरी करू इच्छिते. आता मी आई आणि वडिलांसोबतच राहू इच्छिते.

आग्रा पोलिसांनी केले समुपदेशन

मुलगी मिळाल्याने तिचे आई आणि वडीलही आनंदात आहेत. अल्पवयीन मुलीला 5 नोव्हेंबरला नारी निकेतनमधून तिच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले होते. त्यानंतर ती हरियाणात आपले गुरू कौशल गिरींकडे गेली आणि त्यांच्यासोबत राहू लागली. नातेवाईकांनी ठाणे ढौकी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी समुपदेशन सुरू केले आणि नंतर अल्पवयीन मुलीला रेस्क्यू करून आग्र्यात परत आणले. तिच्या नातेवाईकांना सुपूर्द केले. आपली मुलगी परत मिळाल्याने आई-वडील आनंदात आहेत आणि पोलिसांचे आभार मानत आहेत.

महंत कौशल गिरीने मुलीला फसवले: आई

आता अल्पवयीन मुलीची आई सांगते की महंत कौशल गिरीने तिच्या मुलीला फूस लावली होती. ती परत आली आहे, यामुळे कुटुंब आनंदात आहे. 13 वर्षीय मुलीने सांगितले आहे की ती आता अभ्यास करू इच्छिते. तिच्या इच्छा आता बदलल्या आहेत. ती आयुष्यात काही चांगले करून देशाचे नाव उज्ज्वल करू इच्छिते. ती आपल्या भविष्यासाठी महत्वाकांक्षी आहे.