पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी मोदी म्हणाले, फाळणीचे चटके कधीही विसरु शकत नाही!

देशभरात सध्या भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. मात्र भारताच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी मोदी म्हणाले, फाळणीचे चटके कधीही विसरु शकत नाही!
narendra modi
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 2:13 PM

नवी दिल्ली : देशभरात सध्या भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. मात्र भारताच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ट्विट केलं आहे. फाळणीचं दु:ख विसरु शकत नाही. या फाळणीत बळी गेलल्या लोकांच्या आठवणीत 14 ऑगस्टचा दिवस ‘विभाजन विभीषिका’ स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

इंग्रजांपासून भारताला मिळालेलं स्वातंत्र आणि भारताची फाळणी हे एकाचवेळी झालं. या फाळणीवेळी धर्माच्या नावाने हिंसाचार झाला होता. यामध्ये अनेक बळी गेले होते.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणतात, “देशाच्या फाळणीचं दु:ख कधीही विसरलं जाऊ शकत नाही. तिरस्कार आणि हिंसेमुळे आमच्या लाखो बंधू-भगिनी स्थलांतरित व्हावं लागलं. काहींना तर प्राण गमवावे लागले. त्या लोकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या आठवणीत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीची दु:खद आठवण अर्थात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून आठवला जाईल, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि तिरस्काराचं विष संपवण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही तर यामुळे एकता, सामाजिक सद्भाव आणि मनुष्याच्या संवेदना आणखी मजबूत होतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.