
लखपती दीदी योजनेने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. आज स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आकडाच सांगितला. देशात नियो मीडिल क्लास तयार झाल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. देशात लखपती दीदींची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने देशात 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा पण केला आहे. डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवले आहे. आता देशात इतक्या महिला लखपती झाल्या आहेत. पंतप्रधानांनी तो आकडाच सांगितला.
लखपती दीदींचा नवीन रेकॉर्ड
मोदी सरकारने देशभरात 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यातील 2 कोटी महिला लखपती झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. लखपती दीदीने मोठा रेकॉर्ड केल्याचे सूतोवाच त्यांनी केले. पंतप्रधानांनी लवकरच पुढील उद्दिष्ट पण गाठण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यामुळे देशात महिला सबलीकरणाचा लक्ष्य गाठण्यात यश आल्याचे स्पष्ट होत आहे. आर्थिक सबलीकरणाच्या मोहिमेत महिलांचा वाटा वाढल्याचे ही आकडेवारी दर्शवते.
लखपती दीदी योजना काय?
मोदी सरकारने देशात लखपती दीदी योजना सुरू केली आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची घोषणा केली होती. आता त्याला दोन वर्षे उलटली आहे. महिलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ही योजना आहे. काही राज्यात ही योजना या घोषणेपूर्वीच राबवण्यात येत होती. 4 नोव्हेंबर 2022 रोजीपासूनच ही योजना त्या राज्यात राबवण्यात येत होती. आता या योजनेला दोन वर्षे झाली आहेत.
देशात आता दोन कोटी महिला या लखपती झाल्याची घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली. या योजनेत महिलांना सुक्ष्म कर्ज (Micro Credit) पुरवठा करण्यात येतो. महिलांना उद्योग, शिक्षण आणि इतर गरजांसाठी अल्प कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेत तारण काही ठेवावे लागत नाही.
योजनेत प्रशिक्षणाची सोय
लखपती दीदी योजना केवळ कर्ज पुरवठा करत नाही तर महिलांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण ही देण्यात येते. जो व्यवसाय महिलांना करायचा आहे, त्याची इत्यंभूत माहिती आणि प्रशिक्षण देण्याचे काम योजनेतंर्गत करण्यात येते.
प्लम्बिंग, एलईडी बल्ब, ड्रोन अशा अनेक व्यवसायांचे प्रशिक्षण या योजनेत देण्यात येते.
ही लागतात कागदपत्रं
१.लाभार्थ्याचे आधारकार्ड
२.पॅनकार्डची फोटोकॉपी
३.बॅकेचे पासबुक झेरॉक्स
४.शैक्षणिक कागदपत्रे
५.मोबाईल क्रमांक
६.पासपोर्ट आकाराचा फोटो