
2024मध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. व्यक्तीच नव्हे तर जगासाठीही हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे. केवळ भारतातच नव्हे तर या वर्षी जगात अनेक घटना घडल्या आहेत. इतिहासात नोंद केल्या जाईल अशा घटना घडल्या आहेत. काही सुखद घटना होत्या, तर काही जगाला हादरवणाऱ्या घटना होत्या. अयोध्येत राम मंदिर निर्माण होणं असो, लेबनानमधील पेजर अटॅक असो की डोनाल्ड ट्रम्प यांची वापसी असो अशा अनेक महत्त्वाच्या घटनांनी 2024 वर्ष हे भरून गेलं होतं. 2024मधील अनेक घटना संस्मरणीय आहेत. इतिहास बदलवणाऱ्या आहेत. तर काही घटना इतिहासात काळीमा फासणाऱ्या आहेत. भारतातही अशा काही घटना घडल्या. जगातही घडल्या. याच वर्षी कुणाची आर्थिक भरभराट झाली. तर कुणाला जगातून एक्झिट घ्यावी लागले. ज्या लोकांनी देशांचं सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत योगदान दिलं अशांनी जगाचा निरोप घेतला. तर काहींचं जाणं धक्कादायक होतं. 2024मधील या घटनांचाच घेतलेला हा मागोवा. ...