AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj Ashram : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जातेय सांगून विभा घराबाहेर पडली, पण त्यानंतर अपेक्षित नव्हतं ते घडलं

Premanand Maharaj Ashram : प्रेमानंद महाराज यांचं आश्रम वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. नोएडा येथील 35 वर्षीय विभा 'आश्रमात जातेय' सांगून घरातून तर निघाली, त्यानंतर अपेक्षित नव्हतं तेच घडलं... जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे.

Premanand Maharaj Ashram : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जातेय सांगून विभा घराबाहेर पडली, पण त्यानंतर अपेक्षित नव्हतं ते घडलं
Premanand Maharaj Ashram
| Updated on: Oct 03, 2026 | 12:51 PM
Share

Premanand Maharaj Ashram : अनेकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या प्रेमानंद महाराज यांचं आश्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल आहे. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक 35 वर्षीय महिला प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात जाते… असं सांगून निघाली, पण परत घरी परतलीच नाही. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नोएडा येथे राहणारी विभा घरातून बाहेर तर निघाली. पण आता ती कुठे आहे आणि कोणत्या परिस्थितीत आहे. याबद्दल कोणाला काहीही माहिती नाही. विभा हिच्या शोधात तिचे कुटुंबिय गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. अशात मुलीच्या शोधात विभा हिचे वडील उमेश सिंह आणि अन्य कुटुंबिय देखील वृंदावन येथे पोहोचले आहेत.

15 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर निघाली विभा…

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, विभा हिने MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे आणि ती प्रेमानंद महाराज यांची फार मोठी भक्त आहे. कुटुंबियांचं असं देखील म्हणणं आहे की, यापूर्वी देखील अनेकदा आश्रमात गेली आणि घरी परतली आहे. पण आता 15 ऑगस्ट रोजी ‘प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात’ जातेय असं सांगत घरातून निघालेली विभा घरी परतलेली नाही आणि तिच्याबद्दल कोणती माहिती देखील मिळालेली नाही. कुटुंबियांचा शोध सुरु असून, पोलिस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

विभा हिच्या वडिलांचं असं सांगणं आहे, विभा हिचा कोणताच पत्ता लागत नसल्यामुळे कुटुंबिय चिंतेत आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही तिच्याच शोधात आहोत, पण अद्यापही तिच्याबद्दल कोणतील माहिती मिळालेली नाही. विभा हिचा शोध घेवून देखील कोणतीच माहिती मिळालेली नाही. म्हणून वृंदावन येथे पोहोचून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.. असं देखील विभा हिचे वडील म्हणाले आहेत.

आश्रमात असल्याची शक्यता…

उमेश सिंह यांच्यानुसार, त्यांनी मुलीला आश्रमात जाताना प्रत्यक्ष पाहिलं नाही. पण मुलीची अस्था आणि त्याआधी देखील आश्रमात गेल्यामुळे विभा आश्रमातच असू शकते… अशी शक्यता कुटुंबियांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, कोणती दुर्घटना घडायला नको… याच आशेत विभा हिचं संपूर्ण कुटुंब आहे. वडिलांनी संबंधिक व्यक्ती आणि पोलिसांना शोध कार्य करण्यासाठी विनंती केली आहे..

हाथरसचा तरुणही गायब

हे प्रकरण अशा वेळी समोर आलं आहे, जेव्हा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाशी संबंधित आणखी एका बेपत्ता तरुणाबाबत त्याचे कुटुंबीयही वृंदावन येथे पोहोचले होते. हाथरस येथील रहिवासी असलेला 18 वर्षीय अनुज चौधरी याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, तो सुमारे तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. कुटुंबातील सदस्यांनी आश्रमाबाहेर जाऊन निदर्शने देखील केली. कुटुंबीयांनी आश्रम व्यवस्थापनावर मुलाची भेट न घेवू देण्याचा आरोप केला आहे.

पण, नोएडाच्या आश्रमात विभा उपस्थित आहे की नाही, याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कुटुंबाच्या तक्रारीनंतर आणि पोलिसांच्या तपासानंतरच विभा कुठे आहे आणि ती बेपत्ता होण्याचं नेमकं कारण काय आहे, हे स्पष्ट होऊ शकेल. सध्या कुटुंबीय तिच्या सुरक्षित परतण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

Follow Us
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?