
देशाची राजधानी दिल्लीपासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर एक असे गाव आहे जे हिस्ट्रीशीटर म्हणजे सराईत गुन्हेगारांचे माहेर म्हटले जाते. या गावाची लोकसंख्या ३५,००० इतकी आहे. परंतू गावात ३९ हिस्ट्रीशीटर आणि सुमारे ३५० एक्टीव्ह हार्डकोअर क्रिमिनल राहात आहेत. हे गुंड हत्या, लूटमार, दरोडा, चोरी आणि गोहत्या अशा गुन्ह्यातील आरोपी आहेत. या गावातील गुंडाची अशी दहशत आहे की खाकी वर्दी देखील येथे जायला घाबरते…येथे काही दिवसांपूर्वी मोठा गुन्हा घडला आहे.
हिस्ट्रीशीटर्स हे गाव आहे गाजियाबाद येथील मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘नाहल’.. एका कालव्याच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावाचा इतिहास ब्रिटीशांपासून गाजत आहे. कनॅलच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावात गुडांनी आसरा घेतलेला आहे. हे गाव पुन्हा चर्चेत येण्यामागे एक भयंकर घटना येथे घडली आहे. येथे एक भयंकर प्रकार घडला आहे. एका हिस्ट्रीशीटर्सला पकडण्यास गेलेल्या पोलिसांच्या टीमवरच गुंडांनीच गोळीबार केला. पोलिसांवर झालेल्या अंधाधुंद गोळीबारात एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला..
लुट प्रकरणातील मोस्ट वॉण्टेड आरोपीला पकडण्यास गेलेल्या कादीर नावाच्या एका आरोपीला पकडण्यासाठी नोएडा पोलीसांची एक टीम काही दिवसांपूर्वी गेली होती. त्या टीमने खतरनाक हिस्ट्रीशीटर कादीर यास पकडले. तेव्हा त्याला सोडवण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि इतर साथीदारांनी पोलिसांच्या टीमनेच फायरिंग केली आणि यात कॉन्स्टेबल सौरभ देशवाल नावाचा पोलिस कॉन्स्टेबलची हत्या झाली. त्यानंतर संतापलेल्या पोलीसांनी मोठी फौजफाटा घेऊन गावात छापेमारी सुरु केली. कॉन्स्टेबल सौरभ यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पोलीसांबरोबर झालेल्या चकमकीत आतापर्यंत ४ हिस्ट्रीशीटर्सच्या पायात गोळ्या घातल्या आहेत आणि १५ गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये हे गाव नेहमीच संवेदनशील वर्गातच मोडते. यास कारण गावातील गुंडाची वस्ती म्हटले जाते. या नाहल गावात सकाळ होताच गुन्हेगार चोरी लुटमारी करण्यासाठी घराबाहेर पडतात.या गावातील हिस्ट्रीशीटर आणि खतरनाक आरोपी कादीर याला पकडतानाच नाहल गावात नोएडा पोलिस खात्यातील कॉन्स्टेबल सौरव यांची गावातील गुंडांनी गोळीबार करुन हत्या केली. कादीर मसुरी पोलिस ठाण्याचा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. या गावातील खतरनाक नामचीन 39 हिस्ट्रीशीटर्समध्ये शमशाद उर्फ चंदू सर्वात जुना हिस्ट्रीशीटर्स आहे.
शमशाद उर्फ चंदू याचे वय सुमारे 70 वर्षे आहे. चंदू 70 च्या दशकापासून गुन्हेगारी जगतात सामील झाला आणि हत्या, लूटमारी, दरोडे यांसारख्या अनेक गुन्ह्यात याचे नाव सामील आहे. चंदू शिवाय नाहल गावांत राहणाऱ्या हिस्ट्रीशीटरमध्ये रहमान, शमशाद, मुनव्वर, राशिद, खालिद, नसीम, हनीफ, अशरफ, फिरोज, रिहान, निजामुद्दीन, रईस, इमरान, रियाजुल, आबिद, मोहसिन, अब्दुल रहमान, परवेज, राशिद, साजिद, फरमान, तय्यब, अकील, आदिल, वसीम भूरा, गुलफाम, जीशान, आसिफ, दानिश, सिराजुद्दीन, कबीर, मुशाहिद, फिरोज, आजाद, जावेद इनु आणि अयूब सारख्या गुन्हेगाराचा समावेश आहे.
नाहल गांवात कांस्टेबलची हत्या झाली.या गावात सुमारे 39 हिस्ट्रीशीटर आणि 350 हून अधिक गुन्हेगार रहात आहेत. यातील बहुतांश गोहत्या आणि लुटमारीत सामील असतात. यांच्यावर अंकुश लावण्यासाठी पोलिस वेगाने कारवाई करीत आहे. सर्व हिस्ट्रीशीटर्संवर नजर ठेवली जात आहे. आता पोलिसांनी या गावाला गुन्हेगार मुक्त बनविण्याचा निर्णय घेतल्याचे गाजियाबादचे अतिरिक्त आयुक्त आलोक प्रियदर्शी यांनी म्हटले आहे.
कांस्टेबल सौरभ यांची हत्या झाल्यानंतर पोलीस प्रचंड आक्रमक झाल्याने या नाहल गांवात जबरदस्त छापेमारी चालू आहे. आतापर्यंत 15 लोकांना अटक झाली आहे. यात चार हिस्ट्रीशीटरशी पोलिसांची चकमक झाली आहे. या चौघांच्या पायात गोळ्या लागल्या आहेत. या कॉन्स्टेबल सौरभ यांची हत्या आणि त्यानंतर पोलीसांनी सुरु केलेले कोबिंग ऑपरेशननंतर तर गावात सन्नाटा पसरला आहे. 35000 लोकसंख्येच्या गावातील लोक घरांना कुलुपबंद करून पसार झाले आहेत. जेथे कधी काळी रस्त्यांवर माणसांची गर्दी असायची तेथे आता सन्नाटा पसरला आहे.