AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाबहार बंदराबाबत भारताचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ, थेट एकही…

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. मात्र, यादरम्यान भारताने अत्यंत मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.

चाबहार बंदराबाबत भारताचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ, थेट एकही...
Chabahar Port
| Updated on: Feb 04, 2026 | 11:27 AM
Share

भारत आणि अमेरिकेत कायमच चांगले संबंध राहिले. मात्र, अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर संबंध तणावात आली. नुकताच अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींना प्रचंड वेग आला. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या झळा जगाला बसत असतानाच अमेरिका आणि इराणमधीलही तणाव वाढला. इराणवर अमेरिका कोणत्याही क्षणी हल्ला करू शकते असे सांगितले जात आहे. शिवाय इराणमध्ये मोठे वादळ आले असून सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराणची वचक कमी झाली. भारत आणि इराणचे संबंध कायमच चांगले राहिले. भारतासाठी इराण अत्यंत महत्वाचे नक्कीच आहे. कारण भारतासाठी इराणचे चाबहार हे बंदर अत्यंत महत्वाचे आहे. भारताने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात चाबदार बंदरामध्ये मोठी गुंतवणूकही केली होती.

400 कोटींची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भारताने करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावेळी भारताने एकही रूपयांची गुंतवणूक या बंदरात न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. भारतासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या चाबदार बंदरातून भारताने मागे हटण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेचा दबाव आणि इराणची सध्याची परिस्थिती बघता भारताने मागे हटण्याचा निर्णय घेतल्याचे कळतंय.

हे बंदर मोठ्या जहाजांसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते. यासोबतच चाबहार बंदर पाकिस्तानच्या ग्लादर बंदरापासून फक्त 170 किलोमीटर अंतरावर आहे. चाबहार बंदर भारताला हवे असण्याचे प्रमुख आणि मोठे कारण म्हणजे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ टान्सपोर्ट कॉरिडॉर आहे. मुळात म्हणजे या मार्गाने भारताला युरोपपर्यंत वाहतूक नक्कीच सोपी ठरते याचा इराणसोबतच थेट रशियालाही फायदा होतो.

नरेंद्र मोदी 2026 मध्ये इराण दाैऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी थेट 55 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. भारतासाठी हे बंदर अत्यंत महत्वाचे ठरते. कारण भारत हा पाकिस्तानला बाजूला सारून थेट मध्य आशियाच्या बाजारपेठांपर्यंत आरामात पोहोचू शकतो. 2024 मध्येच भारताने इराणसोबत चाबहार बंदराबाबत मोठा करार केला होता. हे बंदर भारतासाठी किती जास्त महत्वाचे आहे हे माहिती असतानाही भारताने या बंदरातून माघार घेतली.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...