गोव्यात 'ही' पाच नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर, आता गोव्याचे सूत्र कुणाच्या हातात सोपवले जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आपल्या हाती घेण्यासाठी काँग्रेस-भाजपसह इतर लहान पक्षांनी हालचाली वेगवान केल्या आहेत. या सर्व राजकीय हालचालींमध्ये प्रामुख्याने पाच नावं गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिसून येतात. डॉ. प्रमोद सावंत : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर …

, गोव्यात ‘ही’ पाच नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर, आता गोव्याचे सूत्र कुणाच्या हातात सोपवले जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आपल्या हाती घेण्यासाठी काँग्रेस-भाजपसह इतर लहान पक्षांनी हालचाली वेगवान केल्या आहेत. या सर्व राजकीय हालचालींमध्ये प्रामुख्याने पाच नावं गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिसून येतात.

डॉ. प्रमोद सावंत : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर ज्यांचं नाव आहे, ते म्हणजे डॉ. प्रमोद सावंत. प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे विद्यमान सभापती आहेत. प्रमोद सावंत हे भाजपकडून सॅन्क्वेलिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. शिक्षणाने आणि व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

श्रीपाद नाईक : केंद्रीय मंत्रिमंडळात ‘आयुष’ मंत्रालयाचे राज्यमंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांचे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाव आलं आहे. पर्रिकरांच्या आजारपणाच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा होत असे, त्यावेळीही श्रीपाद नाईक यांचे नाव आघाडीवर असे.

दिगंबर कामत : 2005 साली भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे पुन्हा भाजपमध्ये परतून, गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी चर्चा कालपासून सुरु झाली आहे. 2007 ते 2012 या कालावधीत कामत गोव्याचे मुख्यमंत्री होते.

विजय सरदेसाई : विजय सरदेसाई हे गोव्यातील फतोर्डा विधानसभा मतदारसंघातून आमदार असून, गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आहेत. तसेच, गोव्याच्या विद्यमान सरकारमध्ये सरदेसाई हे मंत्रीही सुद्धा आहेत. गोवा फॉरवर्ड पार्टीचे एकूण तीन आमदार गोव्यात असल्याने विजय सरदेसाई यांचे राजकीय वजनही वाढले आहे.

सुदीन ढवळीकर : महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे नेते सुदीन ढवळीकर हेही गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतले प्रमुख स्पर्धक आहेत. गोव्यात मगोपाचे 3 आमदार असल्याने ढवळीकरांचे राजकीय वजनही वाढले आहे. ढवळीकर पाचवेळा गोव्याच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे शासकीय-प्रशासकीय कामाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.

गोवा विधानसभा पक्षीय बलाबल

एकूण जागा: 40
रिक्त जागा- 4
सध्याचे संख्याबळ – 36
भाजप आघाडी

भाजप- 12
मगोप– 3
गोवा फॉरवर्ड- 3
अपक्ष- 3

काँग्रेस आघाडी

काँग्रेस : 14
राष्ट्रवादी – 1

गोव्याची सध्याची राजकीय परिस्थिती काय?

गोव्यात मार्च 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 40 पैकी सर्वाधिक 17 जागा जिंकल्या. भाजपने या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. पण 2 अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी 3 आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.
त्यंच्या अटीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात परतून मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यानुसार मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा 14 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *