Firecrackers : या शहरात फटाके फोडला तर 6 महिने तुरुंगात जाल..प्रशासनचा कडक आदेश..

| Updated on: Oct 19, 2022 | 9:50 PM

Firecrackers : या शहरात जर फटाके फोडला तर तुम्हाला यंदाची दिवाळी तुरुंगात काढावी लागेल..

Firecrackers : या शहरात फटाके फोडला तर 6 महिने तुरुंगात जाल..प्रशासनचा कडक आदेश..
तर तुरुंगाची तयारी ठेवा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाचे निर्बंध (Covid-19) लादल्यानंतरची ही पहिलीच निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali) असणार आहे. पण यंदाच्या दिवाळीत या शहरात फटाके फोडल्यास तुरुंगवास (Jail) तर घडेलच पण दंडही (Penalty) ठोठावल्या जाणार आहे. त्यामुळे येथील शहरवासियांना राज्य सरकारने, ‘दिवा लावा, पण फटाके पेटवू नका’ असे आवाहन केले आहे.

तर यंदाची दिवाळी दिल्लीवासियांसाठी महागात पडू शकते. पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी बुधवारी नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड लागेल.

एवढ्यावरच न थांबता दिल्ली सरकारने विस्फोटक अधिनियमाच्या कलम 9Bनुसार, राजधानी परिसरात फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड लागेल आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.

हे सुद्धा वाचा

मुंबई पोलीस दिवाळी सणाच्या तोंडावर सजग झाले आहेत. त्यांनी विना परवाना फटाक्यांची विक्री केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात विना परवाना फटक्यांची विक्री केल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीत फटाके उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरोधात राज्य सरकार कारवाई करत आहे. त्याऐवजी सरकारने 21 ऑक्टोबर रोजी नागरिकांसाठी जागरुकता अभियान सुरु केले आहे.

त्यानुसार, दिवे लावा, फटाके नाही, असे अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत राज्य सरकार कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये 51,000 दिवे लावणार आहे. तर फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने 408 पथकांची स्थापना केली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत 210 पथके स्थापन करण्यात आली आहे. तर महसूल विभागातंर्गत 165 पथके असतील. प्रदूषण नियंत्रण समितीच्या 33 टीम असतील.