AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 मिनिटांचा खूनी खेळ, 6 जणांचा जागीच मृत्यू… अंगावर काटा आणणारा हत्याकांड… जाणून घ्या संपूर्ण Timeline

6 People Murder Story : आधीच क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या आरोपीचा 36 मिनिटांचा रक्तरंजित खेळ; अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर 6 जणांचा खून... अंगावर काटा आणणारा हत्यांकाड... जाणून घ्या 'त्या' 36 मिनिचांमध्ये नेमकं काय काय घडलं? सध्या या प्रकरणाचा पोलीस सध्या कसून तपास करत आहेत....

36 मिनिटांचा खूनी खेळ, 6 जणांचा जागीच मृत्यू... अंगावर काटा आणणारा हत्याकांड... जाणून घ्या संपूर्ण Timeline
| Updated on: Jul 12, 2026 | 10:49 AM
Share

6 People Murder Story : पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर लगेचच सहा जणांची सामूहिक हत्या केल्याची घटना समोर येत आहे. आरोपीने शुक्रवारी रात्री जवळपास 10.45 वाजता ते 11.21 वाजेच्या मध्ये, म्हणजे फक्त 36 मिनिटांमध्ये 6 जणांची हत्या केली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद मंडलच्या दैवलगुडा गावातील एका तरुणाच्या कृत्याने तेलंगणात खळबळ उडाली आहे. आरोपीने सर्वात आधी पोक्सो केस दाखर करणारी 16 वर्षीय तरुणी, तिची आई, आजी यांची हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःच्याच घरी जाऊन पत्नी आणि चार वर्षांचा मोठा मुलगा आणि 18 महिन्यांच्या दुसऱ्या मुलाची हत्या केली आहे.

पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने केलेल्या या सिरीयल किलिंग्जचा घटनाक्रम देखली समोर आला आहे. 35 वर्षीय आरोपी राजकुमार शहाबाद शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या घरी गेला; याच मुलीने मे महिन्यात त्याच्याविरुद्ध पाठलाग आणि लैंगिक छळाचा ‘पोक्सो’ गुन्हा दाखल केला होता. त्या मुलीच्या 42 वर्षीय आईने दरवाजा उघडताच राजकुमारने तिच्यावर चाकूने अत्यंत हिंसक हल्ला केला आणि तिची हत्या केली. त्यावेळी रात्रीचे 10.45 वाजले होते.

पीडितेच्या आईची हत्या केल्यानंतर आरोपी घरात घुसला आणि पलंगावर झोपलेल्या 60 वर्षी आजीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर 16 वर्षीय मुलीला बळजबरीने कारमध्ये बसवलं. त्यानंतर मुलीला एका निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिच्यावर देखील चाकूने वार केले आणि तिचा मृतदेह नदीकिनारी फेकला. त्यानंतर आरोपी स्वतःच्या घरी गेला. आरोपी रात्री 11.21 वाजता स्वतःच्या गावातल्या घरी शिरला. तो तिथे केवळ सहा मिनिटेच थांबला. या काळात, त्याने 31 वर्षांची पत्नी आणि दोन लहान मुलांची, ते झोपलेले असताना गळा चिरून निर्घृण हत्या केली. रात्री 11.27 वाजता तो घरातून पळून गेला.

हत्याकांडानंतर वडिलांना केला फोन, ‘मी 6 मर्डर केली आहेत…’

तब्बल 6 जणांची हत्या केल्यानंतर आरोपी राजकुमार याने वडिलांना फोन केला. फोन करुन त्याने वडिलांना सांगितलं की, मी 6 जणांची हत्या केली आहे…. असं म्हणाला आणि फोन कट केला. त्यानंतर पसार झाला. अशात आरोपीच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी 6 मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले.

POCSO प्रकरण

या संपूर्ण हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी पोलीस कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेशी निगडीत आहे. एका अल्पवयीन मुलीने आणि तिच्या आईने केलेल्या तक्रारीवरून, मे महिन्यात आरोपी राजकुमारविरुद्ध POCSO कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांपासून वाचण्यासाठी लपून बसलेला होता.

न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन

जून महिन्यात आरोपीने कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केलं. तर गंभीर आरोप असताना त्याला कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती. त्यामुळे, न्यायालयाने कायदेशीर आणि तांत्रिक आधारांवर त्याची याचिका मंजूर केली. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडलं. तुरुंगातून सुटताच त्याने हे भयंकर कारस्थान केलं.

पोलिसांचं सर्च ऑपरेशन जारी

एकाच व्यक्तीने 6 जणांची हत्या केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पीडितांच्या कुटुंबियांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. पोलीस सध्या याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रागाच्या भरात सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. निरागस मुलांची त्याने हत्या केली आहे. यामागचं कारण त्यांच्या अटकेनंतर आणि कसून चौकशी केल्यानंतर समोर येईल.

Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?