
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स देशांच्या दौऱ्यावर आहेत. ते आफ्रिकेतही जातील. मोदी 2 ते 9 जुलै दरम्यान घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामीबिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसोबत भारताचे दृढसंबंध आहेत. मोदींच्या या दौऱ्याने ते वृद्धींगत होतील. या दौऱ्यादरम्यान ते ब्राझील येथे 17 व्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होतील.
पंतप्रधान मोदी 2 जुलै रोजी पहिल्यांदा घाना या देशाला भेट देतील. गेल्या तीन दशकात पहिल्यांदा एखादा भारतीय पंतप्रधान या देशाच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान ते राष्ट्रपती नाना अकुफो-आडो यांची भेट घेतील. आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारीविषयी दोन्ही देशात चर्चा होईल. या देशाशी व्यापारी करारामुळे ECOWAS आणि आफ्रिकी संघाशी भारताचे नाते मजबूत होण्याची शक्यता आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगोशी दृढसंबंध
3-4 जुलै रोजी पंतप्रधान मोदी हे त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाच्या दौर्यावर असतील. 1999 नंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान या देशात असतील. मोदी हे राष्ट्रपती क्रिस्टीन कंगालू आणि पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांची भेट घेतली. या देशात मोदी हे त्रिनिदादच्या संसदेला संयुक्तरित्या संबोधित करतील.
अर्जेटिनासोबत ऋणानुबंध
अर्जेंटिनासोबत भारताचे ऋणानुबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4-5 जुलै रोजी अर्जेटिनात असतील. ते राष्ट्रपती झेवियर माईली यांची भेट घेतील. या भेटीत ते संरक्षण, कृषी, ऊर्जा, खनिजकर्म, व्यापार आणि गुंतवणुकीवर चर्चा करतील. या जुन्या मित्राशी भारताचे नाते अनेक नवीन धोरणांवर दृढ होईल.
ब्रिक्स शिखर संमेलन आणि ब्राझील यात्रा
5 ते 8 जुलै दरम्यान पंतप्रधान मोदी ब्राझील यात्रेवर आहेत. राजधानी रिओ डी जेनेरिया येथे 17 वे ब्रिक्स शिखर संमेलन होईल. या संमेलनात जागतिक विविध प्रश्नावर चर्चा होईल. यामध्ये एआय, आरोग्य, जागतिक अर्थव्यवस्था, पर्यावरण, प्रदूषण या विषयावर चर्चा होईल. याशिवाय ब्रासीलियामध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डी सिल्वासोबत पंतप्रधान कृषी, अंतराळ, संरक्षण, तंत्रज्ञानासह आर्थिक आघाडीसंबंधी चर्चा करतील.
9 जुलै रोजी नामीबिया दौरा
अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9 जुलै रोजी नामीबिया दौऱ्यावर आहेत. हा या देशातील त्यांचा पहिला दौरा आहे. राष्टपती नेटुम्बो नंदी-नदैतवाह यांची ते भेट घेतील. ते देशाचे पहिले राष्ट्रपती आणि स्वातंत्र्य सेनानी डॉ. सॅम नुजोमा यांना श्रद्धांजली अर्पण करतील.