AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा बाबा नाही भोळा, भक्तांच्या खासगी क्षणावर ॲपद्वारे त्याचा डोळा, टेक्नोसेव्ही भोंदूबाबाचे असे फुटले बिंग

Bhondu Baba Arrested : मोबाईल मधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेरातून खाजगी क्षण बघणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा बाबा नाही भोळा, भक्तांच्या खासगी क्षणावर ॲपद्वारे त्याचा डोळा, टेक्नोसेव्ही भोंदूबाबाचे असे फुटले बिंग
टेक्नोसेव्ही भोंदूबाबाचा प्रतापImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 28, 2025 | 12:42 PM
Share

पुण्यात एका भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईल मधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेरातून खाजगी क्षण बघणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाच नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींने बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. भोंदूबाबाच्या या प्रकारमुळे भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याने असाच प्रकार इतर भक्तांसोबत केला आहे का, याचा पोलीस तपास करत आहे. पण अशा प्रकारामुळे भक्तांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे.

खासगी क्षण चोरून पाहायचा

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार या भोंदू बाबाने त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबाने फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक छुपे ॲप डाऊनलोड केले. त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला. फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले. इतकेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने अशीच अनेकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

एअर ड्रॉइ़ड कीड या ॲपचा वापर

आरोपी बाबा अगोदर भक्ताला जाळ्यात ओढत होता. तो भक्ताला तुमचा आकस्मिक मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा. भक्त घाबरला की, त्याला या संकटातून वाचवण्याचे वचन द्यायचा. त्यासाठी मंत्रपूजा करण्याचे नाटक करायचा. भक्तांना एकांतात ध्यान करण्यास सांगायचा. त्याचदरम्यान भक्तांचा मोबाईल ताब्यात घ्यायचा. त्याचा पासवर्ड विचारायचा. मोबाईलमध्ये एअर ड्रॉइ़ड कीड ॲप डाऊनलोड करायचा. या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा. ते सध्या कुठे आहेत. त्यांनी कोणते कपडे घातले आहेत. त्यांनी दिवसभरात काय काय केले यांची इत्यंभूत माहिती तो भक्तांना द्यायचा. त्यामुळे बाबाकडे कोणती तरी मोठी शक्ती असल्याचा विश्वास भक्तांना बसायचा.

असे फुटले बिंग

बाबा जे सांगत असे ते भक्त करत असत. त्याच्यावर भक्तांचा कमालीचा विश्वास बसला होता. एका भक्ताचा मोबाईल सातत्याने गरम होत होता. तेव्हा त्याच्या एका मित्राला त्याने तो दाखवला. या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप असून त्याच्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याचे मित्राने सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण केवळ बाबाच्या हातात मोबाईल दिल्याचे त्याला आठवले. त्याने इतर भक्तांना सुद्धा त्याची माहिती दिली आणि बाबाचे भिंग फुटले.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....