
देशातील गुन्हेगारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. अशातच आता उत्तर प्रदेशातील बागपत येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केला आहे. या महिलेचे लग्न एका वर्षापूर्वी झाले होते. तिचा पती लग्नावेळी मिळालेल्या हुंड्यामुळे नाराज होता, तसेच त्याला जुगाराचेही व्यसन होते. लग्नानंतर या महिलेला नरक यातना भोगाव्या लागल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पीडित महिलेने आरोप केला आहे की, तिच्या पतीला जुगार खेळण्याचे व्यसन होते. पैसे संपल्यांनंतर एके दिवशी त्याने जुगारात पत्नीला लावले आणि तो हरला. यानंतर 8 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. यात सासरा, दोन दीर आणि इतर नातेवाईकांचाही समावेश आहे. आता ती न्यायासाठी भटकताना दिसत आहे. तिने पोलीस अधिक्षकांची भेट घेत आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न 24 ऑक्टोबर 2024 रोजी मेरठमधील खिवई गावातील दानिशशी झाले होते. मात्र लग्न झाल्यापासून तिला त्रास सहन करावा लागत आहे. दानिशला दारू आणि जुगाराचे व्यसन आहे, एके दिवशी तो जुगारात पत्नी हरला. यानंतर महिलेने आरोप केला की, 8 पुरूषांनी माझ्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. गाझियाबादमधील तीन पुरूष होते, ज्यांना मी ओळखत होती. मला सर्वात जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा नातेवाईकांनी आणि सासऱ्यांना माझ्यावर अत्याचार केले.
पीडितेने म्हटले की, मला सासरच्या लोकांनी सांगितले की, जर हुंडा आणला नाही तर तिला प्रत्येक आज्ञा पाळावी लागेल आणि त्यांना खूश करावे लागेल. मी गर्भवती होते तेव्हा कुटुंबाने मला गर्भपात करायला लावला. माझ्या पायावर अॅसिड ओतण्यात आले. तसेच मला मारण्यासाठी नदीत ढकलण्यात आले, मात्र माझा जीव वाचला. मी माझ्या पालकांच्या घरी पोहोचले, त्यांनी मला आसरा दिला. आता पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.