देशासाठी काळा दिवस…रात्रभरात मृत्यूचे तांडव, 89 लोकांचा मृत्यू, 114 जणावर दगावली, तब्बल इतके लोक जखमी, काही क्षणातच..

एक धक्कादायक घटना घडली. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. एक वादळ आले आणि आपल्यासोबत तब्बल 89 लोकांना घेऊन गेले. 114 जणावरांचाही मृत्यू झाला. या चक्रीवादळाची काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

देशासाठी काळा दिवस...रात्रभरात मृत्यूचे तांडव, 89 लोकांचा मृत्यू, 114 जणावर दगावली, तब्बल इतके लोक जखमी, काही क्षणातच..
UP
| Updated on: May 14, 2026 | 12:05 PM

बुधवार 13 मे 2026 रोजी मोठी धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने कहर केला. या घटनेत 89 लोक ठार झाले तर 53 लोक गंभीर जखमी आहेत. उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने आणि चक्रीवादळाने कहर केला. फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगढ, भदोही, देहाट, चंदौली, सोनभद्र, बरेली, मिर्झापूर, बदाऊन, उन्नाव, कानपूर या जिल्ह्यात पावसाचा थैमान बघायला मिळाले. मोठं मोठी झाडे पडली. घरे पडली. एक थैमान निसर्गाने घातले. ज्यात अनेक लोकांची जीव गेली. या वादळात एकट्या प्रयागराजमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्यही तातडीने सुरू करण्यात आले. मात्र, वारे आणि पाऊस इतका जास्त भयंकर होता की, बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी केला.

चक्रीवादळात जनावरांचाही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. 114 जनांवरांचा या वादळात जीव गेला. वित्त आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विनिता सिंह यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांमधून माहिती गोळा करत आहे. महसूल विभाग सध्या माहिती संकलित करत आहे. त्यामुळे तात्काळच मृतांचा आकडा सांगणे कठीण आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला. काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. मृतांचा आकडा वाढण्याचेही संकेत आहेत. हवामान विभागाने अलर्ट अगोदरच जारी केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि चक्रीवादळ येईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. अचानक चक्रीवादळ सुरू झाले आणि पावसालाही जोरदार सुरूवात झाली.

या चक्रीवादळाचे काही धक्कादायक व्हिडीओही पुढे येत आहेत. या व्हायरल व्हिडीओमधून परिस्थिती किती जास्त गंभीर आहे हे कळते. प्रशासनाकडून मदतकार्य राबवले जात आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या चक्रीवादळात झालेले नुकसान भरून देण्याची मागणी लोकांकडून होत आहे. काहींनी थेट सरकारविरोधात निर्देशने सुरू केली आहेत. फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे.

Follow Us