AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णय

भारत आणि श्रीलंका कसोटी मालिकेचं महत्त्व माहिती असल्याने सर्वांचा नजरा खिळल्या आहे. दोन्ही संघांना वर्ल्ड चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. सराव सामन्यात भारताने बाजी मारली. पण असं असूनही टीम इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णय
IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया़ दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णयImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 10, 2026 | 2:40 PM
Share

IND vs SL Test Series: भारत श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघ पास झाला आहे. पण मालिकेत खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने आराम करण्याऐवजी सराव सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. सराव सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कामाला लागली आहे. सरावादरम्यान टीम इंडियाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. मालिकेदरम्यान वर्कलोडकडे लक्ष ठेवून संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजांना आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांना आराम दिला गेला आहे. पण युवा वेगवान गोलंदाज आकिब नबीला मात्र सराव करण्यास भाग पाडलं. सरावादरम्यान आकिब नबी हा एकमेव गोलंदाज गोलंदाजी करत होता.

आकिब नबीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण!

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी आकिब नबीची वर्णी लागली आहे. आता त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरीकडे, त्याला वॉर्मअप सामन्यात सर्वात कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पहिल्या डावात तर त्याने एकही चेंडू टाकला नाही. दुसऱ्या डावात त्याला संधी मिळाली, पण फक्त 5 षटकं टाकली. त्यात त्याला एकही विकेट मिळाला नाही. त्यामुळे त्याचा पहिल्या सामन्यात प्लेइंग 11 साठी फार काही विचार केला जात नाही. पण एक बॅकअप प्लान म्हणून संघ व्यवस्थापन त्याच्याकडून नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करून घेत आहेत.

सरफराज खान कसोटीसाठी सज्ज

सरफराज खानला पुन्हा एकदा टीम इंडियात जागा मिळाली आहे. साई सुदर्शन जखमी असल्याने त्याच्या जागी सरफराजला संधी दिली आहे. सरफराज खान शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत दीड वर्षांच्या कालावधी लोटला आणि आता कुठे संधी मिळाली. या संधींचं सोनं करण्यासाठी सरावात घाम गाळत आहे. सरफराज खानला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता संधी मिळाल्यानंतर काय करतो याकडे लक्ष असेल. या मालिकेत जर फेल गेला तर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळणं खूप कठीण होईल.

Follow Us
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ