AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6,6,0,6,6..! वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारचा शेवटच्या षटकात धमाका, गौतम गंभीरही झाला खूश Video

IND vs SLCXI : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यात सराव सामना सुरू आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याचं वादळ शेवटच्या षटकात घोंघावलं. त्याचा आक्रमक बाणा पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूश झाला.

6,6,0,6,6..! वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारचा शेवटच्या षटकात धमाका, गौतम गंभीरही झाला खूश Video
6,6,0,6,6..! वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारचा शेवटच्या षटकात धमाका, गौतम गंभीरही झाला खूश VideoImage Credit source: Screenshot/Sony Liv
| Updated on: Aug 08, 2026 | 7:59 PM
Share

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. एक तर दुखापतीचं ग्रहण लागलं असल्याने भारतीय संघ ताकही फुंकून पित आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. असं असताना सराव सामन्यात श्रीलंका क्रिकेट इलेव्हन संघ भारतीय संघावर भारी पडतो की काय अशी स्थिती होती. पहिल्या दिवशी पहिल्या डावात श्रीलंकेने 363 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात एकदम खराब झाली. पण देवदत्त पडिक्कल आणि रवींद्र जडेजाने टीम इंडियाला सावरलं. दुसऱ्या दिवशी भारताने जोरदार कमबॅक केलं आणि 6 गडी गमवून 357 धावा केल्या. भारतीय संघ 6 धावांनी पिछाडीवर आहे. पण या सामन्याच्या शेवटच्या षटकात हे अंतर 31 धावांचं होतं होतं. पण 90व्या षटकात गुरनूर ब्रारचं वादळ घोंघावलं आणि हे अंतर 6 धावांवर आलं.

शेवटच्या षटकात गुरनूर ब्रारने काय केलं?

दुसऱ्या दिवशी 90 षटकांचा खेळ संपला तेव्हा देवदत्त पडिक्कल नाबाद 142 आणि गुरनूर ब्रार नाबाद 36 धावांवर खेळत आहेत. 90व्या षटकात भारतीय संघाने 25 धावा कुटल्या. यापैकी 24 धावा या एकट्या गुरनूर ब्रारने मारल्या. दिलुम सुदीरा गोलंदाजीसाठी आला होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलने एक धाव घेतली आणि 12 धावांवर खेळत असलेल्या गुरनूर ब्रारला स्ट्राईक दिली. त्याने स्ट्राईक मिळतात आक्रमक बाणा दाखवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारले. त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा षटकार मारले. त्याचा आक्रमक अंदाज आणि खेळी पाहून गौतम गंभीरही स्वत:ला आवरू शकला नाही. त्याने त्याच्या खेळीचं कौतुक करत हसत हसत टाळ्या वाजवल्या.

गुरनूर ब्रारची अष्टपैलू खेळाडू

गुरनूर ब्रारने पहिल्या दिवशी आपल्या गोलंदाजीने लक्ष वेधून घेतलं. गुरनूर ब्रारने 12 षटकात 49 धावा देऊन एक गडी बाद केला. त्यानंतर आता फलंदाजीतही कमाल केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने 18 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 36 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 200 चा होता. त्याच्या आक्रमक खेळीमुळे पहिल्या डावातील धावांचं अंतर 6 धावांवर आलं आहे. तिसऱ्या दिवशीच्या सुरूवातीला भारतीय संघ आघाडी घेईल यात काही शंका नाही. इतकंच काय तर शुबमन गिल व्यवस्थित असेल तर फलंदाजीला उतरू शकतो. त्यामुळे आता नजरा तिसऱ्या दिवशीच्या खेळाकडे लागल्या आहेत.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?