AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?

शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण… नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?

| Updated on: Aug 10, 2026 | 1:04 PM
Share

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात चर्चा सुरू असताना आता राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, तसेच कर्जमाफीसाठीची मुदत वाढवावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन बाबासाहेब पाटील यांनी दिले आहे.

राज्यात सुमारे 56 लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. मात्र, सुरुवातीपासूनच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी उपलब्ध होत नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया काही प्रमाणात रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना काही तारखा देण्यात आल्या होत्या, मात्र यादी वेळेत मिळाली नाही, हा केवळ बहाणा असल्याचे म्हणणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारने आठ बँकांकडून कर्जमाफीसंदर्भातील माहिती घेतली असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. सुरुवातीला 580 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी आयकर विभागाकडून संबंधित यादी सरकारला प्राप्त झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

या प्रक्रियेत सुमारे 1 लाख 40 हजार शेतकरी पात्रतेच्या निकषांमध्ये येत असल्याचेही बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करून पुढील प्रक्रिया केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

“वेळ लागेल, पण पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार,” असे आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 10, 2026 01:04 PM

Follow Us