मृत्यूच्या 2 वर्षांनंतर प्रसिद्ध गायकाचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल; दारु, हॉटेल, सोबत दोन महिला आणि…, थक्क करणारं वास्तव
सेलिब्रिटींच्या निधनानंतर त्यांच्या अनेक गोष्टी आणि रहस्य समोर येत असतात. पण आता तर प्रसिद्ध गायकाच्या निधनाच्या 2 वर्षांनंतर त्याचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

‘वन डायरेक्शन’चा एक्स मेंबर आणि लोकप्रिय ब्रिटिश सिंगर लियाम पायने याच्या निधनाला जवळपास आता दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. फार कमी वयाच्या गायकाने शेवटचा श्वास घेतला. पण त्याच्या निधनाचं रहस्य अद्यापही उलगडलेली नाही. 16 ऑक्टोबर 2024 मध्ये 31 व्या वर्ष लियाम पायने याचं निधन झालं. ब्युनोस आयर्समधील ‘कासासुर पालेर्मो हॉटेल’च्या तिसऱ्या मजल्यावरून पडून लियामचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी 3 हजारपेक्षा जास्त कागदपत्र आणि फोटो समोर आल्यानंतर गायकाच्या शेवटच्या क्षणांबद्दल मोठी चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, या फोटो आणि व्हिडीओमध्ये हॉटेलमधील लियाम याचे क्षण, स्टाफसोबत त्याचं बोलणं… आणि शेवटच्या क्षणी त्याच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल पाहायला मिळत आहे.
Never-before-seen photos of Liam Payne’s last hours from police files https://t.co/JZ8GLWpw82 Sorry the guy was so down, can’t blame his Environment, as he had the money to order everything. Very sad
— Solar Life (@SOLARLIFE) August 9, 2026
दोन महिलांसोबत दिसला लियाम
लियाम याच्या काही फोटोंमध्ये हॉटेल स्टाफ त्याच्या घरापर्यंत दारु पोहोचवताना दिसत आहे. तर दुसऱ्या दिवशी लियाम याची भेट दोन अनोळखी महिलांसोबत होते. रिपोर्टनुसार, लियाम याने त्या महिलांसाठी गाणं देखील गायलं आणि त्यांना कोकीनबद्दल देखील विचारलं. पण समोर आलेल्या सर्व गोष्टींना निर्णायकपणे सिद्ध झालेली तथ्ये मानणं योग्य ठरणार नाही, कारण तपास आणि कायदेशीर प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर पार पडल्या आहेत.
मृत्यूच्या काही तासांपूर्वी बाल्कनीमध्ये बेशुद्ध पडलेला लियाम
लियाम याची प्रकृती पाहिल्यानंतर स्टाफ देखील चिंतेत आलेले. रिपोर्टनुसार, त्याची वागणूक फार विचित्र होती, तेव्हा हॉलेट स्टाफने लियाम याला त्याच्या खोलीपर्यंत पोहोचवलं होतं. त्यानंतर एकाने इमरजेंसी सर्व्हिसला फोन केला आणि सांगितले गेस्ट प्रचंड त्रासलेला असून नियंत्रणाबाहेर आहे आणि तो स्वतःला हानी पोहोचवू शकतो… चिंतेची बाब म्हणजे लियामच्या खोलीला बाल्कनी होती. त्यानंतरच्या तपासात हा फोन कॉल एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरला. अर्जेंटिनातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खाली पडण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी लियाम हॉटेलच्या लॉबीमध्ये शुद्धीवर असलेल्या अवस्थेत दिसला होता आणि तीन व्यक्तींनी त्याला त्याच्या खोलीपर्यंत नेलं होते.
दारु आणि ड्रग्समध्ये मिळवलेले अन्य पदार्थ
तपासात असं देखील समोर आलं आहे की, लियान याचं निधन साधी घटना नव्हती, पोस्टमार्टममध्ये असं देखील दिसून आलं की, उंचीवरुन पडल्यामुळे गायकाला दुखपत झालेली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, गायकाच्या शारीरात कोकीन आणि दारुचं प्रमाण फार होतं. त्यानंतर तपासात असं देखील समोर आलं आहे की, त्याने दुसऱ्या पदार्थांचा देखील वापर केलेला. एवढंच नाही तर, नशेत असल्यामुळे लियाम याला काही कळलं नाही आणि तो बाल्कनीतून खाली कोसळला.
या प्रकरणात हॉटेलचे काही कर्मचारी आणि इतर व्यक्तींवर विविध आरोप करण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी 2025 मध्ये अर्जेंटिनाच्या एका न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी लियामचा मित्र आणि व्यवस्थापक रोजेलिओ ‘रोजर’ नोरेस तसेच इतर तिघांवरील खटला रद्द केला; त्याच वेळी, अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा आरोप असलेल्या दोन व्यक्तींवर मात्र खटला चालवण्यात आला.
