AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambani Family : अंबानींच्या कोट्यवधींच्या अँटिलियात 11वा मजला का आहे खास? ते ‘सीक्रेट’ अखेर समोर

अंबानींच्या आलिशान अँटिलियामध्ये धुनिक लक्झरीसोबतच अँटिलियात परंपरा व आस्थेचा संगम दिसतो. मात्र तिथल्या 11व्या मजल्याबाबत व्हायरल दाव्याने उत्सुकता वाढवली आहे. नेमकं काय आहे तिथे ?

| Updated on: Aug 10, 2026 | 2:18 PM
Share
मुंबईच्या आकाशाला गवसणी घालणारं मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं आलिशान घर ‘अँटिलिया’ जगभरात चर्चेचा विषय आहे. तब्बल 27 मजली या घरात अशा अनेक सुविधा आहेत, ज्याची कल्पनाही सामान्य माणूस करू शकत नाही. स्विमिंग पूल, जिम, स्पा, थिएटरपासून हेल्थ सेंटरपर्यंत... अँटिलियामध्ये ऐषआरामाची अक्षरशः रेलचेल आहे. पण या सगळ्यापेक्षा एक गोष्ट अँटिलियाबाबत सर्वाधिक उत्सुकता निर्माण करते. या भव्य इमारतीच्या 11व्या मजल्यावर नेमकं काय आहे? ते जाणून घेण्याचं कुतुहल अनेकांना आहे. ( All Photos : Social Media)

1 / 6
अँटिलियाच्या 11व्या मजल्याबाबत सोशल मीडियावर एक रंजक दावा व्हायरल झाला आहे. एका बाबाजींच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला की, अँटिलियाचा 11वा मजला खास पंडितांसाठी राखीव आहे. हो , तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. या  व्हिडिओमधील दाव्यानुसार, या मजल्यावर पंडित राहतात आणि अंबानी कुटुंबासाठी नियमितपणे पूजा-पाठ, मंत्रजप, यज्ञ आणि विविध धार्मिक विधी केले जातात. अर्थात, या दाव्याला अंबानी कुटुंबाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे ही माहिती सोशल मीडिया व्हिडिओतील दाव्यापुरतीच मर्यादित आहे.

2 / 6
अँटिलियाच्या आलिशान जगाची कल्पना करताना डोळ्यासमोर महागड्या वस्तू, चमचमणारे इंटिरियर आणि अत्याधुनिक सुविधा येतात. पण व्हायरल दाव्यानुसार या घरात यासोबतच धार्मिक वातावरणही असतं. कुटुंबाची सुख-समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहावी यासाठी नियमित पूजा-अर्चना केली जाते, असा दावा करण्यात आला आहे. मंत्रोच्चार, यज्ञ आणि धार्मिक विधींनी अँटिलियाचा हा मजला सतत गजबजलेला असतो, असंही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

3 / 6
अँटिलियामध्ये एक भव्य मंदिर असल्याची चर्चा अनेकदा होताना दिसते. या मंदिरात मौल्यवान धातू आणि रत्नांनी सजवलेल्या मूर्ती असल्याचे दावेही सोशल मीडियावर केले जातात. नवरात्र, गणेश चतुर्थी, महाशिवरात्री किंवा इतर महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी अंबानी कुटुंबाकडून विशेष पूजा आणि अनुष्ठान केले जात असल्याचंही पाहायला मिळतं. अँटिलिया जितकं आधुनिक आणि आलिशान आहे, तितकंच त्यात परंपरा आणि आस्थेलाही स्थान असल्याचं दिसतं.

4 / 6
मात्र अनेकांना असाही प्रश्न पडतो की, 27 मजली अँटिलियामध्ये अंबानी कुटुंब नेमकं कुठे राहतं? अंबानी कुटुंब 27व्या मजल्यावर राहत असल्याचं सांगितलं जातं. आणि यामागेही एक खास कारण आहे.  नीता अंबानी यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, या मजल्यावर भरपूर नैसर्गिक सूर्यप्रकाश, ताजी हवा आणि शांतता मिळते. मुंबईच्या सततच्या गर्दी आणि गोंगाटापासून दूर, कुटुंबाला खासगी आणि शांत वातावरण मिळावं, यासाठी हा मजला निवडण्यात आल्याचं सांगितलं जातं.

5 / 6
अँटिलियामध्ये जवळपास प्रत्येक सुखसोय उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं. स्विमिंग पूल, स्पा, जिम, थिएटर, गार्डन, हेल्थ सेंटर अशा अनेक सुविधा या इमारतीत आहेत. पण अँटिलियाची खरी खासियत फक्त त्याची अफाट श्रीमंती नाही. एका बाजूला अत्याधुनिक लक्झरी आणि दुसऱ्या बाजूला पूजा-पाठ, परंपरा आणि धार्मिक आस्था, असा अनोखा मिलाफ या घरात पाहायला मिळतो. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा