वराचे वय ६०, वधूचे २३…३७ वर्षांनी लहान वर्षा राणीबरोबर पिंकूने घेतले सात फेरे, जगावेगळा विवाह…
पिंकू सिंह या लग्नामुळे खूप आनंदी झाले आहेत. आपण वर्षाला कायम आनंदी ठेवू असे ते म्हणतात. गावात त्यांचे घर आहे. लग्नानंतर ते त्यांच्या घरी गेले. काही जणांनी मोबाईलने या लग्नाचा व्हिडीओ तयार केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी ? अशी म्हण प्रसिद्ध आहे. विवाह हा खाजगी मामला असतो अशी ही म्हण दर्शवत असते. परंतू आपल्या पेक्षा ३७ वर्षांनी लहान असलेल्या अवघ्या २३ वर्षांच्या मुलीशी एका ६० वर्षांच्या वृद्धाचा विवाह लागला असेल तर तुम्हाला विश्वास बसेल काय ? हो असे घडले आहे. या दोघांनी मांडपात थोरा मोठ्यांच्या आशीवार्दात थाटामाटात लग्न केले आहे. वधूने देखील आपल्या मर्जीने हा विवाह होत असून कोणाची जोरजबरदस्ती नाही असे म्हटले आहे.
बिहारच्या लखीसराय येथील विवाह सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. जिल्ह्यातील रहिवासी पिंकू सिंह ( वय ६० ) यांनी या वयात दुसरे लग्न केले आहे. या लग्नाची खास बातमी म्हणजे वधूचे वय केवळ २३ आहे. या लग्नाचा व्हिडीओ चर्चेत आहे. अनेक जण दोघांच्या वयातील ३७ वर्षांच्या अंतरावर बोलत आहे. तर काही जण जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.
लखीसरायच्या अभयपुरचे पीरीबाजार ठाणे क्षेत्रातील रामपूर गावाचे निवासी पिंकू सिंह यांनी ६० पावसाळे पाहिले आहेत. आता त्यांची नवीन वधू वर्षा राणी हिला या लग्नाला कोणाही विरोध नाही. दोघांनी एकत्र प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील लोकही या वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी पोहचले आहेत. गावातील लोकांच्या उपस्थितीत रामपूर मंदिरात दोघांचा विवाह संपन्न झाला आहे.
पिंकू सिंह हे त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत या गावात राहात होता. ते शेतकरी असून मजूरी करुन आपले जीवन जगतात. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मुलं देखील त्यांच्या सोबत राहात नाहीत. त्यात त्यांची ओळख वर्षा राणी हिच्याशी वाढत गेले. जी त्यांच्या घरी मदतीला आली होती. अनेक दिवस एकमेकांना ओळखल्यानंतर त्यांनी एकत्र राहून वैवाहिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला.
वर्षा राणी हिचे देखील आधी लग्न झाले होते
वर्षा राणी हिचे देखील आधी लग्न झाले होते तिला मुलगी देखील आहे. परंतू आता पती तिच्या सोबत रहात नाही. वर्षा हीने लव्ह मॅरेज केले होते. सासरला असताना एकदा लागलेल्या आगीत वर्षा प्रचंड जखमी झाली. तिचे प्राण तर वाचले पण शरीरावर आगीच्या जखमांचे व्रण कायम राहिले. पतीने तिला त्यानंतर सोडले आणि तो वेगळा राहू लागला. कुटुंबाने त्यांच्या काडीमोड घडवला. वर्षा तिच्या माहेरी एकटीच राहात होती. वयातील अंतर मिठवून दोघांनी एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला. भगवान शंकर-पार्वती यांना साक्षी मानून पिंकू सिंह याने वर्षाच्या भांगेत सिंधूर भरले.
