सावधान हा महाभयंकर आजार वेगाने पसरतोय; 246 जणांना लागणं, 65 जणांचा मृत्यू, आता नवं संकट
मोठी बातमी समोर येत आहे, आता आणखी एका आजाराने चिंता वाढवली आहे. हा आजार कोरोनापेक्षाही खतरनाक माणला जातो, कारण या आजारामध्ये मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे जगाची झोप उडाली आहे.

काही वर्षांपूर्वी जगावर कोरोनाचं मोठं संकट आलं होतं. कोरोनामुळे अनेकांनी आपला जीव गमावला, जगभरात लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोमुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन लावावं लागलं, याचा सर्वात मोठा फटका हा जागतिक अर्थव्यवस्थेला बसला होता. दरम्यान त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता जगात आणखी एका व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. आफ्रिका खंडातील कांगोमध्ये इबोला व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 246 जणांना या आजाराची लागण झाली असून, या आजारामुळे 65 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजार अधिक वेगाने पसरतो त्यामुळे त्याला खूप खतरनाक मानलं जातं. त्यामुळे कांगो देशाच्या शेजारी जेवढे देश आहेत, त्या सर्व देशांमध्ये तेथील सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हाय अलर्ट जारी केला आहे.
इबोला हा आजार खूप दुर्मिळ आहे. मात्र तेवढाच तो खरतनाक देखील आहे, कारण तो खूप प्रचंड वेगाने पसरतो. इबोला आजारामध्ये मृत्यूचं प्रमाण हे अधिक आहे. हा आजार तरल पदार्थाच्या संपर्कात आल्यास पसरतो जसं की रक्त, रक्तामधून या आजाराचा प्रसार होतो. इबोलावर सध्या तरी कोणताही उपचार तसेच वॅक्सिन उपलब्ध नाहीये. त्यामुळे व्यक्तीमध्ये जे लक्षणं दिसतात त्यावरूनच डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात.
सध्या कांगो देशात इबोला आजाराने धुमाकूळ घातला आहे, हा आजार तिथे झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत या आजारामुळे 65 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कांगो देशाच्या इटुरी प्रांतामध्ये हा आजार पसरला आहे. इटुरी हा कांगोचा खूपच दुर्गम भाग असल्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यात देखील अनेक अडचणी येत आहेत. कांगोचा इटुरी हा भाग देशाची राजधानी किंशासापासून सुमारे एक हजार किलोमिटर दूर आहे. दरम्यान या आजारामुळे आता शेजारच्या देशांना देखील धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.