मोठी अपडेट समोर! अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांचेही नातेवाईक

खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील एक व्यक्ती अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी अपडेट समोर! अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांचेही नातेवाईक
Aparna Mahadik
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 12, 2025 | 5:14 PM

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग 787-8 विमान कोसळून अपघात झाला आहे. या प्रवाशी विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते. हे विमान लंडनला जात होते, परंतु टेकऑफनंतर अगदी 15 मिनिटात विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये 100 हून अधिक प्रवासी मेल्याचे म्हटले जात आहे. आता खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील देखील एक सदस्य विमानात असल्याची माहिती समोर आली आहे.

12 क्रू मेंबर्सपैकी एक

एअर इंडियाच्या बोइंग 787-8 विमानात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. 12 क्रू मेंबर्स पैकी एक अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरते यांचा सख्या भाचा अमोल यांची पत्नी आहे. तसेच क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील आणि मनीषा थापा अशी क्रू मेंबर्सची नावे आहेत.

वाचा: 2 पक्षांमुळे 50 प्रवाशांचा मृत्यू, अहमदाबाद विमान अपघातामागील धक्कादायक कारण आलं समोर

कोणत्या देशाचे किती प्रवासी?

एअर इंडियाच्या माहितीनुसार, बोइंग 787-8 विमानाने दुपारी 1:38 वाजता टेकऑफ केले होते. यात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले

एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. अहमदाबादमध्ये हा अपघात झाल्याने सर्वत्र धूर आणि मलबा पसरला आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. त्यामुळे हॉस्टेलमधील 20 विद्यार्थांचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.