अरविंद केजरीवालांचा दिल्लीत भाजपला झटका, 15 वर्षानंतर भाजप चितपट…

| Updated on: Dec 07, 2022 | 11:46 PM

दिल्ली म्हणजे, आप असंच आता समीकरण झालं आहे कारण दिल्लीची जनता केजरीवालांच्याच पाठीशी उभी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

अरविंद केजरीवालांचा दिल्लीत भाजपला झटका, 15 वर्षानंतर भाजप चितपट...
Follow us on

नवी दिल्लीः दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भाजपला झटका दिला आहे. 15 वर्षांनंतर भाजपची दिल्लीत हार झाली आहे, तर आपनं पहिल्यांदाच महापालिकेवर झेंडा फडकवला आहे. दिल्लीतील आजचा जल्लोष आम आदमी पार्टीचा आहे…कारण दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आपने आता कमाल केली आहे. भाजपच्या 15 वर्षांचा दबदबा केजरीवालांच्या आपनं मोडून काढला असल्याने आता दिल्लीतील राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे.

आम आदमी पार्टीचा झाडू असा काही चालला की, भाजपनं दिल्ली महापालिकेतून सत्ता गमावली आणि आपच्या ताब्यात राजधानीच्या महापालिकेची सत्ता दिली आहे.

दिल्ली महापालिकेच्या एकूण 250 जागांपैकी, आम आदमी पार्टीला 134 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आपला दिल्लीत आता स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

भाजपचे 104 नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसला अवघ्या 9 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे दिल्लीत तरी म्हणजेच काँग्रेस भूईसपाट झाली आहे. त्यामुळे भविष्यात आता काँग्रेससाठी ही चिंतेची बाब असणार आहे. तर इतरांचे 3 नगरसेवक येथे निवडून आले आहेत.

दिल्ली म्हणजे, आप असंच आता समीकरण झालं आहे कारण दिल्लीची जनता केजरीवालांच्याच पाठीशी उभी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

दिल्लीची सत्ताही केजरीवालांकडेच आहे. त्यामुळे स्वत: अरविंद केजरीवालच येथे मुख्यमंत्री आहेत आणि त्याचाही फायदा या निवडणुकीत झाला आहे.आणि आता दिल्ली महापालिकाही आपकडे आलीय.

2012 मध्ये केजरीवालांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली होती अवघ्या 10 वर्षात केजरीवालांनी राजकारणात आपचा दबदबा निर्माण केला आहे.

शक्तिशाली भाजपशी दोन हात करत, केजरीवालांनी आधी दिल्लीची सत्ता मिळवली, नंतर पंजाब काबीज केलं आहे. आता गुजरातमध्ये काय होतं हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होईल, आणि आता दिल्ली महापालिकेवरही आपचा झेंडा फडकवला आहे.