
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने आता मिसाइल चाचणीच्या नावाखाली आपली पोकळ लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी पाकिस्तानने अब्दाली मिसाइलची प्रशिक्षण चाचणी केली. ‘एक्सरसाइज इंडस’ अंतर्गत झालेल्या या चाचणीला इस्लामाबादने मोठी उपलब्धी सांगितली, पण वास्तव हे आहे की अब्दालीची कमाल रेंज फक्त 450 किलोमीटर आहे. जी लाहोरहून पेशावरपर्यंतही पोहोचू शकणार नाही. उलट इस्लामाबादमध्येच पडेल. खरं तर, लाहोर ते पेशावरचं अंतर 521 किलोमीटर आहे, तर इस्लामाबादचं अंतर फक्त 378 किलोमीटर आहे. त्यामुळे ही मिसाइल लाहोरहून इस्लामाबादपर्यंतच अंतर कापू शकेल.
या मिसाइल चाचणीबद्दल पाकिस्तानी लष्कर आणि सरकारने खूप जल्लोष केला. लॉन्चिंगला आर्मी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या कमांडरने, धोरणात्मक योजनांचे अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी पाहिलं. पाकिस्तानचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आणि सांगितलं की यामुळे देशाची संरक्षण नीती बळकट होईल. पण तज्ज्ञांच्या मते, ही चाचणी फक्त एक पोकळ संदेश आहे, जो भारत किंवा आंतरराष्ट्रीय समुदायावर परिणाम करू शकत नाही.
वाचा: ‘याचा अर्थ तुम्ही नालायक…’, पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करताना शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा
भारताच्या अग्निसमोर ही मिसाइल राख आहे
आता भारताच्या मिसाइल यंत्रणेशी तुलना करूया. भारताकडे पृथ्वी-2, अग्नि मालिका (अग्नि-V पर्यंत) आणि ब्रह्मोससारख्या प्रगत मिसाइल्स आहेत. ब्रह्मोस ही सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल आहे, जिचा वेग 3 मॅकपर्यंत आहे आणि रेंज 800 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. अग्नि-V ची मारक क्षमता 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तर पाकिस्तानची अब्दाली मिसाइल अजूनही 450 किलोमीटरवरच अडकली आहे, तांत्रिकदृष्ट्या जुनी, कमकुवत आणि धोरणात्मकदृष्ट्या मर्यादित.
पाकिस्तान स्वतःचं हसू करुन घेतोय
पाकिस्तानी लष्कराचं हे पाऊल फक्त अंतर्गत असुरक्षितता आणि राजकीय दबावापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः जेव्हा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानवर जागतिक दबाव वाढला आहे. भारत या हल्ल्यामागे पाकिस्तान-समर्थित दहशतवाद्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहे. अशा वेळी अब्दाली चाचणीच्या माध्यमातून पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देऊ इच्छितो, पण हा प्रयत्न हास्यास्पद आणि प्रतीकात्मक ठरला आहे.
फक्त नावाची मिसाइल, काम काही खास नाही
आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चाचणीला विशेष महत्त्व मिळालेलं नाही. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अब्दालीसारख्या मिसाइल्सना ना धोरणात्मक महत्त्व आहे ना यामुळे पाकिस्तानच्या लष्करी विश्वासार्हतेत वाढ होते. उलट, पाकिस्तानचे सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला जागतिक पातळीवर अधिक हास्याचा विषय बनवत आहेत. भारत जिथे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात नव्या उंची गाठत आहे, तिथे पाकिस्तान आजही कमी अंतराच्या जुन्या मिसाइल्सवर बरळत फिरतोय.