AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अभिजीत दिपके यांना अटक, दिल्लीत घडामोडींना वेग, मध्यरात्री नेहा बोराला..

अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी विमानतळाहून ताब्यात घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आले.

मोठी बातमी! अभिजीत दिपके यांना अटक, दिल्लीत घडामोडींना वेग, मध्यरात्री नेहा बोराला..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 17, 2026 | 7:11 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीने 16 ऑक्टोबर 2026 रोजी तिरंगा मार्चचे आयोजन केले. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी अगोदर अभिजीत दिपके यांना नोटीस दिली होती. त्यापूर्वी दिल्लीत दाखल होताच पोलिसांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यावेळी जामीन देताना काही अटी मान्य केल्या होत्या. त्यातच पुन्हा दिल्लीत मोर्चा अभिजीत दिपके यांच्याकडून काढण्यात आला. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांना मंडी हाऊसजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आवश्यक पोलीस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मध्यरात्रीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, अभिजीत दिपके यांना पोलिसांनी सोडले नाही. अभिजीत दिपके यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम 65 अंतर्गत ही प्रक्रिया पार पाडली, त्यानंतर मध्यरात्रीनंतर नेहा बोरा यांची मुक्तता करण्यात आली. दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना तिरंगा मार्चच्या अगोदरच पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

16 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस आणि मंडी हाऊससह अनेक भागांत निदर्शने झाली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी कारवाई केली आणि 150 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. आता पोलिसांकडून न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे अभिजीत दिपके यांना हजर केले जाईल. दिल्ली पोलिसांकडून जाहीर करण्यात आले की, अभिजीत दिपके यांना अटक करण्यात आली.

मात्र, अभिजीत दिपके सध्या नक्की कुठे आहेत? याबाबत काहीच माहिती पुढे येऊ शकली नाही. जामीन घेताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांकडून अभिजीत दिपके यांना अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत अभिजीत दिपके यांची रवानगी होणार असल्याची माहिती मिळतंय. नेहा बोराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, मध्यरात्री नेहा बोराची सुटका करण्यात आली. त्यातच ध्रुव राठी याच्याकडून तरूणांना एकत्र येण्याचे आवाहन केले जातंय.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा