Abhijeet Dipke: सरकारने 13 कोटी मतदान चोरले पण अभिजीतला अंत्यविधीला सोडले नाही; आईचा संताप

Abhijeet Dipke: सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना आजीच्या अंत्यसंस्कारासाठी येता आले नाही म्हणून आईने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे.

Abhijeet Dipke: सरकारने 13 कोटी मतदान चोरले पण अभिजीतला अंत्यविधीला सोडले नाही; आईचा संताप
Abhijeet Dipke
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 11:01 AM

कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपकेंची आजी सावित्रीबाई दिपके यांचे शनिवारी निधन झाले. शनिवारीच अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून थेट अटक केली. त्यानंतर दीपके यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही. आता अभिजीत यांची आई आणि कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या आजीचे काल वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. हिंगीली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावात दिपके यांच्या आजीवर अत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र शेवटच्या अत्यंदर्शनासाठी अभिजित दिपके उपस्थित राहणार नाहीत. सरकारला 13 कोटी मतदान चोरायला जमले आणि त्याच्या आजीच्या अंत्यविधीला सोडायला नाही जमले. अभिजित दिपके यांच्या आईने ही प्रतिक्रिया दिली आहे.’

Loading...

नातेवाईकांनी व्यक्त केला संताप

मात्र त्याचवेळी नातेवाईकांनी अभिजित यांच्या कार्याबद्दलही कौतुक व्यक्त केले. “अभिजित दिपके सर्वांच्या भल्यासाठी काम करतो, ही चांगली गोष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते लढत आहेत, याबाबत नातेवाईकांमध्ये स्पष्टता आहे. मात्र व्यक्तिगत दुःखाच्या क्षणी त्यांना कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळाली नाही, हे त्यांना अस्वस्थ करणारे आहे.

“ही बाब देशाला काळिमा फासणारी”

नातेवाईकांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना अशाप्रकारे डांबून ठेवणे, अटक करणे आणि आजीचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना अडवून ठेवणे ही बाब देशाला काळिमा फासणारी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला विमानातून अटक करणे आणि कुटुंबाच्या दुःखातही त्याला सोडणे न देणे, हे अमानुष आणि अन्यायकारक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

अभिजीत दिपकेंना अटक

अभिजीत यांचे वडील यांनी मुलाच्या अटकेच्या कारणांबाबतही प्रश्न उपस्थित केले आणि कथित भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप केला. “माझ्या मुलाला विमानातून कोणत्या कायद्यानुसार अटक करण्यात आली? दहशतवाद्यांना आणि लोकांना फसवून देश सोडून पळून गेलेल्यांना विमानातून किती वेळा अटक केली गेली आहे?” असा सवाल त्यांनी केला. “अधिकार्यांना त्यांचा शोध घेता आला नाही, पण एका विद्यार्थ्याला अटक करता येते. माझ्या मुलाने असे कोणते गंभीर गुन्हे केले आहेत की त्याला अशी वागणूक मिळावी?” असेही त्यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us