AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षाही अधिक चमकदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओवर संतापले अभिजीत दिपके, थेट..

PM Modi on Abhijeet Dipke : पेपरफुटी विरोधातील मोठे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या विधेयकानंतर नरेंद्र मोदी यांनी एक सेल्फी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या या व्हिडीओनंतर त्यांच्यावर निशाणा साधताना अभिजीत दिपके दिसले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षाही अधिक चमकदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओवर संतापले अभिजीत दिपके, थेट..
PM Modi on Abhijeet Dipke
| Updated on: Jul 31, 2026 | 6:48 AM
Share

लोकसभेनंतर राज्यसभेतही पेपर लीक विरोधातील विधेयक मंजूर करण्यात आले. आता हे विधयेक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. हे विधेयक मंजूर करून घेणे म्हणजे सरकारचा मोठा विजय मानला जात आहे. नीट पेपरफुटीनंतर कायद्यात काही मोठे बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर नियमात बदल करून हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले. विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर निशाणा साधताना कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके दिसले. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या चमकणाऱ्या त्वचेवरून निशाणा साधला. गुरूवारी रात्री उशीरा पीएम मोदी यांनी सेल्फी व्हिडीओ शेअर करत परीक्षा प्रक्रियेसाठी हे विधेयक म्हणजे मोठे पाऊस असल्याचे म्हटले.

पेपरफुटी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच व्हिडीओवर निशाणा साधत अभिजीत दिपके यांनी इंस्टाग्रामवरील व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार आहे. अभिजीत दिपके याने व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांच्या चमकदार त्वचेवर टिप्पणी केली. आता अभिजीत दिपके याची ही कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

नीट पेपरफुटीपासून पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सेल्फी व्हिडीओ तयार करून व्हायरल करत आहेत. कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा झाला. सुरूवातीला भाजपाने त्यांचा राजीनामा घेणे टाळले. मात्र, वाढलेल्या दबावानंतर हा राजीनामा घेण्यात आला. धर्मेंद्र प्रधान ओडिसाचे मोठे भाजपा नेते आहेत.

PM Modi on Abhijeet Dipke

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. जंतर मंतरवरील आंदोलन चिघळत होते. देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ज्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. मात्र, अजूनही कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमधील संघर्ष थांबला नाही. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या नाही तर अजून मोठे आंदोलन करू असा इशारा अभिजीत दिपके यांनी सरकारला दिला. यासोबतच भाजपावर काही गंभीर आरोप करताना अभिजीत दिपके दिसले आहेत.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद