कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना..

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन पुकारले आहे. दिल्ली अलर्ट मोडवर आहे. मोठा पोलिस बंदोबस्त दिल्लीत बघायला मिळत आहे. त्यातच आता मोठ्या घडामोडी दिल्लीत घडताना दिसत आहेत. पोलिसांनी मोठी कारवाई केली.

कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना..
Abhijit Dipke Sourav Das and Ashutosh Ranka
| Updated on: Oct 11, 2026 | 9:15 AM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन कॉकरोच जनता पार्टीने पुकारले. या आंदोलनासाठी दिल्लीत मोठ्या संख्येने विद्यार्थी पोहोचले. दिल्लीत कायदा सुव्यवस्थेची स्थिती बघायला मिळतंय. जंतर मंतरवरकडे मोठा फाैजफाटा आहे. सीजेपीच्या कार्यकर्त्यांना जंतर मंतरकडे जाण्यापासून पोलिसांनी काल रोखले. आजही सीजेपीने आंदोलनाची घोषणा केली. सीजेपीचे मुख्य नेतेच पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यानंतर या आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे देण्यात आली. त्यापूर्वीच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.  अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर प्रतिबंधतामक कारवाई करत अटक करण्यात आली. हा सीजेपीसाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. दिल्ली पोलिसांकडून महत्वाच्या नेत्यांवरही ही कारवाई केली.

काल दिल्ली विमानतळावरच या तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईहून दिल्लीत पोहोचेपर्यंत सर्वकाही सामान्य होते. मात्र, दिल्लीत दाखल होताच पोलिसांनी यांंना ताब्यात घेतले. आता यांच्यावर अटकेची कारवाई केली जात आहे. थोड्याच वेळात कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले जाणार आहे. तिथे नक्की काय सुनावणी होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Loading...

एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर तर पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतात. भारतीय न्याय संहितेच्या कलम 126/170 अंतर्गत ही प्रतिबंधतमक कारवाई करण्यात आलीय. अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका यांना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल. दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय. जंतर मंतर परिसरासह दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. राजधानीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून रस्त्यावर बसेस आडव्या लावून मार्ग अडवण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठिकठिकाणी चेतावणीचे फलक लावण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us