अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका कुठे? दिल्ली पोलिसांकडून मोठे उत्तर, काही वेळात..
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच काल दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली. सीजेपीच्या नेत्यांना दिल्ली विमानतळावरूनच ताब्यात घेतले. मात्र, यांना नक्की कुठे ठेवले, याबाबत काही माहिती पुढे येत नव्हती. त्याबाबत मोठी अपडेट पुढे आली.

कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीनंतर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली. सीजेपीने मोठे आंदोलन पुकारले आहे. दिल्ली अलर्ट मोडवर आहे. काल अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोठा बंदोबस्त दिल्लीत बघायला मिळत आहे. काल अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अभिजीत दिपके यांच्यासोबतच महत्वाच्या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यादरम्यानचे काही व्हिडीओही पुढे आली. अभिजीत दिपके नक्की कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला जात होता. दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्ञानेश कुमारला हटवा, अशी मागणी केली जात आहे. कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिकेत आहे. काल यादरम्यानच अभिजीत दिपकेंच्या आजीने जगाचा निरोप घेतला.
वकील रत्ना सिंह यांनी एक ट्विट केले. त्यातच त्यांनी महत्वाची माहिती दिली. अभिजीत दिपके, आशुतोष आणि सौरव यांना आज सकाळी 9 वाजता दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने मला सकाळी याबद्दल माहिती दिली. CJP चे कायदेशीर प्रमुख (Legal Head) म्हणून आमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर वकिलांसह मी स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थित असेन.
अभिजीत दिपके, आशुतोष आणि सौरव यांना दिल्ली पोलिसांनी नक्की कुठे ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून आरोप केला जात होता की, यांच्यासोबत आमचा कोणताही संपर्क होत नाहीये. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली अलर्ट मोडवर आहे. जागोजागी पोलिस बघायला मिळत आहेत.
यादरम्यानच दिल्लीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो पुढे येत आहेत. आजच्या सीजेपीच्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व अजिंक्य शिंदे करत आहेत. आज अभिजीत दिपके जंतर मंतरवर पोहोचणार का? हे देखील पाहण्यासारखे ठपणार आहे. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर प्रतिबंधतामक कारवाई करत अटक. थोड्याच वेळात कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले जाणार. एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर तर पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतात.