AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर दु:खाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू; घरात शोक

अभिजीत दीपके हे दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यासाठी आलेले असताना त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले. याच दरम्यान, हिंगोली येथे दीर्घ आजाराने त्यांच्या आजीचे निधन झाले, त्यामुळे दीपके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर दु:खाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू; घरात शोक
Abhijeet DipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 1:10 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके हे दिल्लीत आंदोलनासाठी आले असता त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आलं आहे. अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. एकीकडे दीपके आंदोलनात असतानाच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दीपके यांच्या आजीचं आज निधन झालं आहे. हिंगोली येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने अभिजीत यांच्या आजीचं निधन झाल्याने घरात शोकाकूल वातावरण आहे.

अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या आईचं निधन झालं आहे. हिंगोली येथील संतुक पिंपरी येथील मूळगावी त्यांची आजी सावित्रीबाई शंकर दीपके यांचं निधन झालं. अभिजीत यांची आजी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यांचं वयही झालं होतं. आजारपणामुळे आज त्यांचं निधनं झालं. त्यामुळे दीपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपके यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता या छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र, आजीचं निधन झाल्याने अभिजीत दीपके यांचे आईवडील तातडीने हिंगोलीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अभिजीत पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आज दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे अभिजीत दीपके सकाळीच मुंबईतून दिल्लीला रवाना झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना दिल्लीत विमानाताच ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे. मात्र, कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. अभिजीत पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना आजी गेल्याची बातमी समजली की नाही हे कळण्यास मार्ग नाही. मात्र, अभिजीतची आजी गेल्याचं कळल्यानंतर पोलीस त्यांना संभाजीनगरला पाठवण्याची शक्यता आहे.

शेवटची भेट नाही

अभिजीत दीपके गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत आंदोलन करण्यासाठी अभिजीत मुंबईला आले होते. त्यानंतर ते घरच्यांच्या केवळ फोनवरून संपर्क आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत असताना ते आजीला शेवटचं भेटल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मात्र, मुंबईत आल्यापासून त्यांचा आजीशी संपर्क नव्हता. मात्र, आता अचानक ही दु:खद बातमी आल्याने अभिजीत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!