AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipke: अभिजित दीपके गद्दार आणि दलितविरोधी… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Abhijit Dipke: गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे चांगलेच चर्चेत आहेत. आता दीपकेंवर एका बड्या नेत्याने आरोप केले आहेत.

Abhijit Dipke: अभिजित दीपके गद्दार आणि दलितविरोधी... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
अभिजीत दीपकेImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 12:37 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणी जंतरमंतर येथे आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके संपूर्ण देशात चर्चेत आहेत. त्यांनी या आंदोलनानंतर देशातील अनेक शाळांची दुरावस्था समोर आणली आणि त्यावर काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका नेत्याने अभिजीत दीपके यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी अभिजीत दीपके गद्दार असल्याचे आणि दलितविरोधी असल्याचा आरोप केला आहे.

आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अभिजीत दीपके यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, “साहिल वाकोडे या दलित विद्यार्थ्याच्या प्रकरणात अभिजित दीपके मूग गिळून शांत बसले. त्यांनी आंदोलन अथवा मोर्चा का काढला नाही? अभिजित दीपके हे खाल्लेल्या मिठाला जागले नाहीत, ते गद्दार आहेत. दलित विद्यार्थ्यांना पाणी दिले जात नाही, परभणीत संविधानाच्या प्रतिकृती मोडतोड केली तेव्हा अभिजीत दिपके कोणत्या वेळात लपून बसले होते. एक दलित मुलगा मरतो आणि अभिजीत दिपकेंना ज्ञानेश कुमार प्रकरण महत्त्वाचे वाटते” असे म्हटले आहे.

वाचा: तुकाराम मुंढेंच्या नोटिशीनंतर राष्ट्रपती स्पष्टच बोलल्या, थेट सेलिब्रिटींना…

“दिपके पार्टी काढून सत्तेत येणार”

पुढे ते म्हणाले की, अभिजीत दिपके पार्टी काढून सत्तेत येणार आहे का? वाकोडेसाठी दिपके आंदोलन करणार की नाही? दिपके हा केजरीवालचे पिल्लू आहे. उपोषण सोनम वांगचुक यांनी केले म्हणून ते आंदोलन यशस्वी झाले, दिपकेमुळे नाही. बाबासाहेब म्हणाले होते, उपोषण म्हणजे अराजकतेचं राजकारण आहे.

“शरद पवारांच्या पासून जातिवाद सुरू झाला”

शेवटी ते म्हणाले की, वाकोडे प्रकरणात राज ठाकरे म्हणाले या प्रकरणात जात आणू नये. राज ठाकरे म्हणाले 2000 सालापासून शरद पवारांच्या पासून जातिवाद सुरू झाला. पण खरा जातिवाद शिवसेनेपासून सुरू झाला. राज ठाकरे खरे जातीयवादी आहेत. बाळासाहेब ठाकरे नामांतर विरोध, शिवसेना सत्तेत आल्यावर मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले हा जातीवाद आहे. राज ठाकरेंनी वाकोडे प्रकरणात आंदोलन का केले नाही.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी