जगभरात घुमतोय आयुर्वेदाचा शंखनाद, आचार्य बालकृष्ण यांचा जगभरातील सर्वोच्च शास्त्रज्ञांमध्ये समावेश

आचार्य बालकृष्ण यांनी केवळ आयुर्वेदाला वैज्ञानिक मान्यता दिली नाही तर जगभरातील शास्त्रज्ञांसाठी निसर्गोपचारात संशोधनाचे नवे मार्गही उघडले आहेत असे स्वामी रामदेव म्हणाले. जगातील अव्वल शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होणे हे नैसर्गिक औषधी वनस्पती आणि पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञानात लपलेल्या अफाट क्षमतेचे प्रतिबिंब आहे असेही ते पुढे म्हणाले.

जगभरात घुमतोय आयुर्वेदाचा शंखनाद, आचार्य बालकृष्ण यांचा जगभरातील सर्वोच्च शास्त्रज्ञांमध्ये समावेश
आचार्य बालकृष्ण
| Updated on: Sep 23, 2025 | 12:12 PM

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील एका संशोधकांच्या गटाने पब्लिशर एल्सेव्हियर यांच्या सहकार्याने यादी प्रकासित केली आहे. त्यानुसार, आचार्य बालकृष्ण यांचा पुन्हा एकदा जगातील टॉप 2% शास्त्रज्ञांमध्ये समावेश झाला आहे. हा टप्पा गाठणे ही केवळ आचार्य बाळकृष्णांसाठीच नव्हे तर पतंजली, आयुर्वेद आणि संपूर्ण राष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. दृढनिश्चय आणि उत्कटता असेल तर काहीही साध्य करता येते हे आचार्य बाळकृष्ण यांनी भारताच्या समृद्ध प्राचीन ज्ञानाचे आधुनिक वैज्ञानिक पद्धतींशी सुंदर मिश्रण करून सिद्ध केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे जगभरातील भविष्यातील शास्त्रज्ञांना नैसर्गिक औषधी वनस्पतींचे फायदे शोधण्यासाठी प्रेरणा मिळेल.

आचार्य बाळकृष्ण यांचे आयुर्वेदातील कौशल्य

संशोधन आणि आयुर्वेदामधील आचार्य बाळकृष्ण यांचे सखोल कौशल्य आणि त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये 300 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. ते त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे प्रतिबिंब आहे. आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली, पतंजलीने 100 हून अधिक पुराव्यावर आधारित आयुर्वेदिक औषधे विकसित केली आहेत, जी सर्वांच्या कल्याणासाठी अ‍ॅलोपॅथिक उपचारांना सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय प्रदान करतात.

आयुर्वेदाची आवड आणि समर्पण

योग आणि आयुर्वेदावरील 120 हून अधिक पुस्तकांचे लेखक, तसेच 25 हून अधिक अप्रकाशित प्राचीन आयुर्वेदिक हस्तलिखितांमध्ये योगदान, यातून आयुर्वेदाबद्दलची त्यांची आवड आणि अढळ समर्पण दिसतं. हर्बल एनसायक्लोपीडियाद्वारे नैसर्गिक औषधी वनस्पतींची यादी तयार करण्याच्या त्यांच्या कार्याने भविष्यातील शास्त्रज्ञांसाठी एक मौल्यवान संसाधन स्थापित केले आहे, ज्याला जगभरातील वैज्ञानिक समुदायाकडून प्रशंसा मिळाली आहे.

आचार्य बालकृष्ण यांनी उत्तराखंडमधील माळगाव येथील हर्बल वर्ल्डच्या माध्यमातून विविध देशांमधील पारंपारिक औषध प्रणाली एकत्रित केल्या आहेत आणि त्या लोकांसोबत शेअर केल्या आहेत, ज्यामुळे तिथे येणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता आणि ज्ञानाचा प्रसार वाढला आहे.

वैज्ञानिक मान्यतेसह आयुर्वेदाची स्थापना

यावेळी योगऋषि स्वामी रामदेव म्हणाले की, आचार्य बालकृष्ण यांनी केवळ आयुर्वेदाला वैज्ञानिक मान्यता दिली नाही तर जगभरातील शास्त्रज्ञांसाठी निसर्गोपचारात संशोधनाचे नवे मार्गही उघडले आहेत. जगातील अव्वल शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होणे हे नैसर्गिक औषधी वनस्पती आणि पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञानात लपलेल्या अफाट क्षमतेचे प्रतिबिंब आहे असेही ते पुढे म्हणाले. भारताच्या संशोधन क्षमता आणि जागतिक नेतृत्वाला उजाळा देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल असे त्यांनी याचे वर्णन केले.

 

स्वस्थ, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत

या खास प्रसंगी, पतंजलीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी आचार्य बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. आधुनिक वैज्ञानिक तंत्रांद्वारे जगभरात आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी आचार्य बाळकृष्ण यांच्या संशोधन आणि समर्पणाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला.आचार्य बाळकृष्ण यांचे प्रेरणादायी योगदान आपल्याला आपल्या कालातीत आयुर्वेदिक ज्ञानाची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालून निरोगी, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याची प्रेरणा देते असेही ते पुढे म्हणाले.