मोठी बातमी! अमेरिका इराणनंतर आता आणखी दोन देश भिडणार, सैन्य जमवण्यास सुरुवात, जगभरात मोठी खळबळ, थेट…
अमेरिका आणि इराणमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद करण्यात आलं आहे, त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

एकीकडे अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढतच चालला आहे. अमेरिका आणि इराणकडून जरी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली तरी देखील अद्यापही यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं होतं, ते अजूनही बंदच आहे. तर दुसरीकडे आता या मार्गावर अमेरिकेनं देखील नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अमेरिका आणि इराण आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष सध्या हा मार्ग पुन्हा व्यापारी जहाजांसाठी कधी सुरू होणार याकडे लागलं आहे. मात्र हे सर्व सुरू असातनाच आता मोठी बातमी समोर आली आहे. आणखी दोन देश आता आमने-सामने आले आहेत.
तुर्की आणि इस्त्रायलमध्ये नवा संघर्ष निर्माण झाला आहे. या तणावाचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रावरचं नियंत्रण आहे. या संघर्षामध्ये आता सोमालिया आणि सोमालीलँड हे दोन देश युद्धाचं मौदान बनले आहेत. तुर्कीने सोमालियासोबतचे आपले संबंध मजबूत केले आहेत. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जमीन आणि समुद्रामध्ये तेल आणि गॅसचा शोधा घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तुर्कीला अधिकार प्राप्त होताच तुर्कीने सोमालियामध्ये आपल्या सैन्यांची संख्या वाढवली आहे. तर दुसरीकडे त्यानंतर इस्त्रायलने देखील मोठा खेळ खेळला आहे. इस्त्रायले सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. इस्त्रायलकडून सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात आली असून, या माध्यमातून या क्षेत्रात प्रभाव निर्माण करण्याचा इस्त्रायलचा प्रयत्न सुरू आहे.
इस्त्रायल हा पहिला देश आहे, ज्याने सोमालीलँडला स्वातंत्र्य देश म्हणून मान्यता दिली आहे. एवढचं नाही तर इस्त्रायलकडून आता अदन खाडीजवळ मोठा सैन्य बेस तयार करण्यात येणार आहे, त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. इस्त्रायलने हा सैन्य बेस तयार करून एका दगडात दोन पक्षी मारण्याची योजना बनवली आहे. एकीकडे इस्त्रायलचं हे सैन्य तुर्कीवर लक्ष ठेवणार आहे, तर दुसरीकडे या सैन्य बेसमुळे यमनच्या हुती बंडखोरांवर नियंत्रण मिळवणं सोपं होणार आहे. दरम्यान इस्त्रायलने घेतलेल्या या निर्णयामुळे आता तुर्की आणि इस्त्रायलमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचं सैन्य लवकरच आमने-सामने देखील येऊ शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे.