Aditya L1 Update | सूर्याच्या दिशेने निघालेल्या आदित्य एल 1 बद्दल ISRO कडून महत्त्वाची अपडेट
Aditya L1 | सूर्य मोहीमेवर निघालेलं Aditya L1 सध्या कुठे आहे?. मॉरिशेस, बंगळुरु आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या ग्राऊंड स्टेशन्सच मॅन्यूव्हर सुरु असताना आदित्य एल 1 वर लक्ष होतं. आदित्य एल 1 हे भारतासाठी खूप महत्त्वाच मिशन आहे.

बंगळुरु : चांद्रयान-3 मिशन यशस्वी ठरल्यानंतर सध्या सर्वांच लक्ष Aditya L1 मोहिमेवर आहे. आदित्य एल 1 ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये एक L1 पॉइंट आहे, तिथे आदित्य एल 1 ला स्थापित करण्यात येणार आहे. सूर्याचा पूर्णवेळ अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आदित्य एल 1 उपग्रह पाठवला आहे. आदित्य एल 1 एकप्रकारे भारताची सूर्याजवळची प्रयोगशाळा असेल. सूर्यावर वादळ येतात, स्फोट होतात, त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो? आपल्या अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांना त्यामुळे काय धोका आहे? याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने आदित्य एल 1 मिशन खूप महत्त्वाच आहे. आदित्य एल 1 चा सूर्यापर्यंतचा प्रवास सोपा नाहीय. पृथ्वीपासून सूर्याजवळ असणाऱ्या L 1 पॉइंटपर्यंतच अंतर 15 लाख किलोमीटर आहे. आदित्य एल 1 तिथपर्यंत पोहोचायलाच जवळपास 4 महिने लागणार आहेत.
आदित्य एल 1 अजूनही पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत आहे. टप्याटप्याने आदित्य एल 1 चा कक्षा विस्तार सुरु आहे. म्हणजे पृथ्वीपासून लांब नेण्यात येत आहे. चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य एल 1 चा कक्षा विस्तार होत आहे. आतापर्यंत आदित्य एल 1 चा तीनवेळा यशस्वी कक्षाविस्तार झाला आहे. गुरुवारी रात्री आदित्य एल 1 वर चौथ मॅन्यूव्हर यशस्वी झालं आहे. इस्रोकडून ही माहिती देण्यात आलीय. “पृथ्वीच्या कक्षेतील चौथं मॅन्यूव्हर यशस्वी झालय. मॉरिशेस, बंगळुरु आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या ग्राऊंड स्टेशन्सच मॅन्यूव्हर सुरु असताना आदित्य एल 1 वर लक्ष होतं” इस्रोने X वर ही माहिती दिलीय. 256 km x 121973 km ही आदित्य एल 1 ची नवीन कक्षा आहे.
Aditya-L1 Mission: The fourth Earth-bound maneuvre (EBN#4) is performed successfully.
ISRO’s ground stations at Mauritius, Bengaluru, SDSC-SHAR and Port Blair tracked the satellite during this operation, while a transportable terminal currently stationed in the Fiji islands for… pic.twitter.com/cPfsF5GIk5
— ISRO (@isro) September 14, 2023
TL1I हे पुढच मॅन्यूव्हर
आता TL1I हे पुढच मॅन्यूव्हर असेल. ही खूप महत्त्वाची प्रोसेस असेल. यामध्ये आदित्य एल 1 ला पृथ्वीची कक्षा सोडून सूर्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरु करेल. 19 सप्टेंबरला पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हे मॅन्यूव्हर पार पडेल. आदित्य एल 1 वर मॅन्यूव्हर का आवश्यक आहेत?
2 सप्टेंबरला भारताच आदित्य एल 1 मिशन लॉन्च झालं होतं. L 1 पॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी उपग्रहाला एक निश्चित ठरवलेली गती मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत आदित्य एल 1 वर पाच मॅन्यूव्हर करण्यात येणार आहेत. आतापर्यंत चार मॅन्यूव्हर यशस्वी झाले आहेत. 3,5 आणि 10 सप्टेंबरचे कक्षा विस्ताराचे मॅन्यूव्हर यशस्वी ठरले होते.
