वास्तविक आणि नाममात्र जीडीपीनंतर आता सोशल मीडियावर अनेकडोटल जीडीपीचा धुमाकूळ, नेमका अर्थ तरी काय?
सध्या भारताच्या जीडीपीचे आकडे आणि अर्थव्यवस्थेवर जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता सोशल मीडियावर एक शब्द चांगलाच चर्चेत आला आहे, तो म्हणजे 'अनेकडोटल जीडीपी'

सध्या भारताच्या जीडीपीचे आकडे आणि अर्थव्यवस्थेवर जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता सोशल मीडियावर एक शब्द चांगलाच चर्चेत आला आहे, तो म्हणजे ‘अनेकडोटल जीडीपी’ हा एक व्यंगात्मक शब्द आहे. या संदर्भात ट्विटरवर करण्यात आलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. वास्तविक आणि नाममात्र जीडीपीनंतर आता ‘अनेकडोटल जीडीपी’ची देखील घोषणा करण्यात येईल, अनेकडोटल जीडीपी हे काही जीडीपी मोजण्याचं कोणतंही अधिकृत माप नाहीये. तर सध्या अर्थव्यवस्थेवर सुरू असलेल्या व्यंगात्मक टिकेवरील एक प्रतिक्रिया आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट नेमकी काय आहे?
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. बग्गी ह्यूमन (@SridharanAnand) नावाच्या एका यूजरने ही पोस्ट शेअर केली आहे, ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये भारताच्या जीडीपीचे आकडे आणि अर्थव्यवस्थेवर सध्या सुरू असलेल्या चर्चेवर व्यंगात्मक टिपणी करताना भाष्य केलं आहे. आता वास्तविक आणि नाममात्र जीडीपीनंतर ‘अनेकडोटल जीडीपी’ देखील जाहीर केली जाईल असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ही पोस्ट उपरोधाने असे सुचवते की, अनेकडोटल जीडीपी ही निवृत्त नोकरशहा, अनिवासी भारतीय अर्थतज्ज्ञ, पत्रकार आणि विद्यार्थी यांच्या मतांवरून निश्चित केला जाईल आणि ‘व्ही-डेम’च्या (V-Dem) सुपरकॉम्प्युटरद्वारे त्याचे मूल्यमापन केले जाईल. वास्तविक पाहता, ही पोस्ट अशा टीकाकारांवर आणि विश्लेषकांवर केलेली एक टिप्पणी आहे, जे देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची मते सरकारी अधिकृत आकडेवारीऐवजी वैयक्तिक अनुभव किंवा निवडक उदाहरणांच्या आधारे बनवतात.
Along with Real & Nominal GDP, MOSPI to publish a new measure called Anecdotal GDP.
Based on feelings of unceremoniously retired babus, NRI economists, constipated journos & JNU dudes who can’t remember year of PhD they’re in. Math to be done by Devesh on V-Dem’s supercomputer.— Buggy Human (@SridharanAnand) September 5, 2026
अनेकडोटल जीडीपीचा अर्थ काय?
अनेकडोटल जीडीपी ही सोशल मीडिया पोस्टमध्ये उपहासात्मकपणे वापरलेली एक काल्पनिक संज्ञा आहे. अनेकडोटल हा शब्द सामान्यतः वैयक्तिक अनुभव किंवा घटनांच्या वैयक्तिक वर्णनांशी संबंधित असतो. या संकल्पनेची सांगड जीडीपीशी (GDP) घालून, ही पोस्ट अधिकृत आकडेवारीऐवजी लोकांचे अनुभव आणि त्यांच्या दृष्टिकोनांवर आधारित अर्थव्यवस्थेचे एक विनोदी पद्धतीने मांडलेले मापण आहे.