एअर स्ट्राईकनंतर आता भारताची पाकला आणखी एक मोठी जखम, हतबल पाकिस्तानने गुडघे टेकले

मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील 4 तर पाकव्याप्त काश्मीरमधील 5 असे एकूण 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

एअर स्ट्राईकनंतर आता भारताची पाकला आणखी एक मोठी जखम, हतबल पाकिस्तानने गुडघे टेकले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 5:29 PM

पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 25 भारतीय तर 1 नेपाळी व्यक्तीचा समावेश होता. या हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आहे. मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील 4 तर पाकव्याप्त काश्मीरमधील 5 असे एकूण 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. एअर स्ट्राईकमुळे घायाळ झालेल्या पाकिस्तानला भारतानं आणखी एक मोठा झटका दिला आहे.

पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्करानं त्यांच्या देशातील धरणं देखील नष्ट केले आहेत. भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या 9 ठिकांणांना लक्ष्य बनवण्यात आलं. मात्र या एअर स्ट्राईकनंतर भारतीय सैनिकांनी नीलम आणि नौसेरी धरणात बॉम्ब टाकल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाकडून करण्यात आला आहे. यामुळे या दोन धरणांचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. यातील नौसेरी धरणावर पाकिस्तानचा विद्युत प्रकल्प आहे, तिथे वीज निर्मिती करण्यात येते.

काय केला पाकिस्तानने दावा?

पाकिस्तानच्या आर्मीकडून असा दावा करण्यात आला आहे की, भारतानं सर्जिकल स्ट्राईकनंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नौसेरी धरणावर बॉम्ब फेकला, यामुळे धरणाचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा देखील पाकिस्तानने केला आहे.

100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू

भारतानं मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. दहशतवाद्यांचे एकूण 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान एकीकडे दहशतवादी आणि आमचा काहीही संबंध नसल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. जिथे हल्ला झाला तिथे दहशतवादी अड्डे नव्हते असा दावाही पाकिस्तानने केला आहे. मात्र दुसरीकडे ज्या दहशतवाद्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगसमोर आला आहे.