मोठी बातमी! ज्योती मल्होत्रानंतर CRPF जवानाचा खरा चेहरा समोर? थेट पाकिस्तानला पाठवले भारताचे…

दिल्लीमधून एका CRPF जवानाला अटक करण्यात आली आहे. त्याने भारताची सिक्रेट माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मोठी बातमी! ज्योती मल्होत्रानंतर CRPF जवानाचा खरा चेहरा समोर? थेट पाकिस्तानला पाठवले भारताचे...
CRPF jawan
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 26, 2025 | 3:46 PM

यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाठापोठ राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआईए)ने दिल्लीतून एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. हा जवान पाकिस्तानला देशाशी संबंधित संवेदनशील माहिती पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जवानाला ही माहिती पाठवण्याच्या बदल्याच पैसे मिळत होते. तो या कामासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत होता. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातून अनेक पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे हेर पकडले गेले आहेत. त्यात सीआरपीएफ जवानाचा देखील समावेश आहे.

जवानाची चौकशी सुरू

एनआईएने सीआरपीएफ जवानाची चौकशी सुरू केली आहे. तो सोशल मीडिया माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात आला होता. अहवालानुसार, जवानाने सोशल मीडिया माध्यमातूनच देशाशी संबंधित गुप्त माहिती पाठवायला सुरुवात केली होती. त्याला यासाठी पैसेही मिळाले होते.
वाचा: पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक

नोकरीवरुन काढून टाकले

अटकेनंतर सीआरपीएफने जवानाला नियमांनुसार नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. आरोपी जवानाने पाकिस्तानमधील हँडलर्सना अनेक संवेदनशील माहिती पाठवली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात अनेक हेर पकडले गेले आहेत. यामध्ये ज्योती मल्होत्रा हे नाव सर्वाधिक चर्चेत होते. यूट्यूबर ज्योतीवर पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवण्याचा आरोप आहे. ती भारतातील पाकिस्तान उच्चायोगाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली होती.

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि तणाव

भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे घेतला गेला. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ल्याची प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने पाकचा उडवून लावला. त्यानंतर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.