Agnipath Scheme Protest : सैन्याच्या तिनही दलात आता केवळ ‘अग्निपथ योजनेद्वारे’च भरती! लष्कर, नौदल आणि वायू सेनेकडून स्पष्ट

आता देशाच्या तिन्ही सैन्य दलात रेग्युलर भरती प्रक्रिया होणार नाही. आता सैन्य भरती ही केवळ अग्निपथ योजनेद्वारेच होईल, असं लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितलंय. लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलीय.

Agnipath Scheme Protest : सैन्याच्या तिनही दलात आता केवळ अग्निपथ योजनेद्वारेच भरती! लष्कर, नौदल आणि वायू सेनेकडून स्पष्ट
भारतीय सैन्य दल
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 19, 2022 | 4:08 PM

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) अत्यंत मोठी बातमी समोर आलीय. आता देशाच्या तिन्ही सैन्य दलात रेग्युलर भरती प्रक्रिया होणार नाही. आता सैन्य भरती (Military recruitment) ही केवळ अग्निपथ योजनेद्वारेच होईल, असं लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितलंय. लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत (Press Conference) ही माहिती देण्यात आलीय. वायू सेनेसाठी 24 जून, नौसेने साठी 25 जून तर लष्करासाठी 1 जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. सैन्याला युवकांची गरज आहे. आज जवानांचं सरासरी वय 32 आहे. ते कमी करुन आपल्याला 26 वर आणायचं आहे. युवक जास्त धोका पत्करु शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 1989 मध्येच या योजनेवर विचार सुरु करण्यात आला होता. ही योजना लागू करण्यापूर्वी अनेक देशाची सेन्य भरती आणि एक्झिट प्लॅनचा अभ्यास केल्याची माहितीही लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली आहे.

कधी होणार भरती प्रक्रियेला सुरुवात?

लेफ्टनंट जनरेल बन्शी पुनप्पा यांनी सांगिलं की 1 जुलैपासून अग्निवीरांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं जाईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार अर्झ करु शकतात. भरतीसाठी पहिली प्रक्रिया ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल. यावेळी फिजिकल टेस्ट आणि मेडिकल होईल. त्यानंतर एन्ट्रन्स परीक्षा होईल. या परीक्षेनंतर मेरिटनुसार उमेदवारांना वेगवेगळ्या जागी पाठवलं जाईल. ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत दोन टप्प्यात भरती प्रक्रिया होईल. पहिल्या टप्प्यात 25 हजार अग्निवीरांची भरती केली जाईल. अग्निवीरांचा दुसरा टप्पा फेब्रुवारीत येईल. अग्निवीरांच्या भरतीसाठी देशात 83 ठिकाणी प्रक्रिया पार पडेल. वायू सेना 24 जून पासून अग्निवीरांची भरती सुरु करेल. तर नौदलाची भरती प्रक्रियेचं 25 जूनपासून जारी केलं जाईल.

पुरुष आणि महिलांची भरती प्रक्रिया होणार

रविवारी सैन्य दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नौदल अधिकाऱ्यांनी सांगितलं की अग्निपत योजनेत पुरुष आणि महिला अशा दोघांचीही भरती प्रक्रिया केली जाईल. अग्निवीरांची पहिली बॅच नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संस्थांना रिपोर्ट करेल, असंही यावेळी सांगण्यात आलं.