
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी संध्याकाळी अपघातस्थळी धाव घेतली. अमित शाह यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यात या भीषण अपघातात वाचलेल्या प्रवाशाची सुद्धा त्यांनी भेट घेतली. त्याच्याशी चर्चा केली. या अपघातात बचावाची शक्यता अगदी कमी होती, असे अमित शाह म्हणाले. मृतांचे डीएनए घटक, नमुने घेण्यात आले आहेत. डीएनएच्या तपासानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात येतील.
या विमानात 230 प्रवासी तर 12 क्रू मेंबर होते. या अपघातात जो प्रवाशी बचावला, त्याला मी भेटलो. या विमानात सव्वा लाख लिटर इंधन होते. येथील तापमान अधिक होते. त्यांनी मयतांच्या कुटुंबियांविषयी संवेदना व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी विमान अपघात, मृत व्यक्ती, जखमी यांची माहिती दिली. एअर इंडियाची फ्लाईट क्रमांक AI-171 ला गुरुवारी दुपारी अपघात झाला. त्यात बचावाची शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले. या घटनेने संपूर्ण देशालाच दु:खात लोटल्याचे ते म्हणाले. दुर्घटनेनंतर 10 मिनिटांनी केंद्र सरकारला त्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्र परिषदेतील ठळक मुद्दे
एयर इंडियाची फ्लाइट क्रमांक AI-171 च्या दुर्घटनेमुळे देशाला धक्का बसला आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश आहे. केंद्र सरकार, गुजरात सरकार आणि पंतप्रधान आणि मी, त्या लोकांच्या दु:खात सहभागी आहे, ज्यांनी त्यांचे जवळच्या व्यक्ती गमावल्या.
अमित शाह यांनी माहिती दिली की, घटनेनंतर मी तात्काळ गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी संपर्क केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क केला. केंद्र आणि राज्य सरकारने मदत कार्य तातडीने सुरु केले.
या विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. या अपघातात एक व्यक्ती बचावला आहे. डीएनए चाचणीनंतर मृतांची संख्या जाहीर करण्यात येईल. या अपघातात सुदैवाने वाचलेल्या प्रवाशा सोबत मी बोललो. प्रत्येक सरकारी विभागाच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.
या विमानात जवळपास 1,25,000 लिटर इंधन होते. उच्च तापमानामुळे कोणत्याही प्रवाशाला वाचवणे अशक्य होते. मी दुर्घटनास्थळी जाऊन आलो. मृतदेह काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रवाशांच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने जमा करण्यात येतील.
#WATCH | Ahmedabad Plane Crash | Union Home Minister Amit Shah meets with the injured, including one injured person who appears to be the lone survivor of the ill-fated flight AI171 that crashed earlier today. pic.twitter.com/t84YyoyseO
— ANI (@ANI) June 12, 2025
परदेशात राहणाऱ्या कुटुंबियांना सुद्धा या दुर्घटनेची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. जवळपास 1000 डीएनए टेस्ट करण्यात येतील. मयतांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. डीएनए तपासानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात येतील. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र आणि गुजरात सरकार संयु्क्तपणे मदत आणि बचाव कार्यात जुंपली आहे. या अपघातात जखमी लोकांची रुग्णालयात जाऊन मी चौकशी केली. मृतांची अधिकृत माहिती ही डीएनए चाचणीनंतर समोर येईल. त्यानंतरची मृतांचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात येईल.
Ahmedabad Plane Crash | Union Home Minister Amit Shah meets with the injured, including one injured person who appears to be the lone survivor of the ill-fated flight AI171 that crashed earlier today. pic.twitter.com/yv0kTykgWV
— ANI (@ANI) June 12, 2025
या घटनेनंतर गुजरात सरकारचा आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती आणि पुनर्वसन विभागाने तात्काळ बचाव आणि मदत कार्याला सुरुवात केली. सर्वच यंत्रणा संयु्क्तपणे बचाव आणि मदत कार्य करत असल्याचे ते म्हणाले.
मयतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. ज्या लोकांचे नातेवाईक परदेशात आहेत, त्यांना अगोदरच सूचना देण्यात आली आहे. ते देशात आल्यानंतर त्यांचे डीएनए नमुने घेण्यात येतील. गुजरातमधील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (NFSU) संयुक्तपणे कमी कालावधीत डीएनए चाचणी पूर्ण करतील. नागरी विमान वाहतूक खात्याने तात्काळ या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.