Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये विमान कोसळले, काय आहे आताची अपडेट, बोईंगच्या 787-8 या प्लेनची वैशिष्ट्ये काय, किंमत किती?
Plane crash in Ahmedabad : गुरुवारी एअर इंडियाचे एक प्रवासी वाहतूक करणारे विमान अहमदाबादा विमानतळाव कोसळले. हे विमान बोईंग कंपनीचे होते. जगभरातील अनेक विमान कंपन्या शक्यतोवर याच विमानाचा वापर करतात. काय आहे आताची महत्त्वाची अपडेट?

Air India Passenger Plane Crash : गुरूवार एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी घातवार ठरला. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे प्रवाशी वाहतूक करणारे प्रवाशी विमान कोसळले. या विमानाने उड्डाण करताच ते कोसळले. या विमानात क्रू मेंबरसह जवळपास 250 यात्रेकरू होते. प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे ही AI 171 फ्लाइट होती. हे विमान झेपावत असतानाच त्याचा काही सेकंदातच संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबाद येथून येणारी छायाचित्र ही अत्यंत भयावह आहेत. विमान कोसळल्यानंतर आकाशात काळा धूर पसरला. अग्निशमन दलाने याठिकाणी धाव घेतली आहे. 7 गाड्यांमधून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
कोणते होते हे विमान
अहमदाबाद येथून उड्डाण घेणारे एअर इंडियाचे हे विमान बोईंग कंपनीचे 787-8 ड्रीमलायनर हे विमान होते. हे विमान 11 वर्षे जुने होते. वृत्त संस्था ANI ने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 242 प्रवासी होते. ताज्या अपडेटनुसार, प्रवाशांना वाचवण्यासाठी या ठिकाणी NDRF ची टीम पोहचली आहे. तर BSF ची टीम सुद्धा घटनास्थळी पोहचली आहे. हे विमान दिल्लीहून अहमदाबाद येथे पोहचले होते. हे विमान लंडनसाठी रवाना होत होते. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेन्द्र पटेल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना घटनेची माहिती दिली. अहमदाबाद येथील पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विमान हादसा मेघानीनगर येथे झाला आहे.
बोईंगच्या 787-8 ड्रीमलायनरची वैशिष्ट्ये काय
हे विमान आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आहे. यामध्ये अनेक प्रगत सुविधा आहेत. त्याच्या कार्यक्षमतेमुळे एअर इंडिया, क्वांटास, जपान एअरलाईन्ससह जगातील अनेक प्रमुख कंपन्यांकडे हे विमान आहे. यामधील नवीन जनरेशनच्या इंजिन्समुळे ते टेकऑफ आणि लँडिंगवेळी कमी ध्वनी प्रदूषण करते. या विमानाचे वजन हलके असते आणि इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी 50 टक्के कंपोझिट मटेरियल असते. जुन्या बोईंग 767 पेक्षा या ड्रीमलायनरमध्ये 20 टक्के अधिक इंधन बसू शकते. याच्या इंधन टाकीची क्षमता 1,26,000 लिटरची असते. या विमानाची लांबी ही 56.7 मीटर तर पंखांची रुंदी 60.1 मीटर आहे. या विमानाची उंची 16.9 मीटर आहे. तर ताशी 913 किमी वेगाने ते उड्डाण करू शकते.
या विमानाची किंमत तरी किती?
या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी दुपारी 1:38 वाजता उड्डाण केले होते. जे विमान कोसळले ते बोईंग कंपनीचे (787-8 ड्रीमलायनर) होते. बोईंग कंपनीचे हे विमान अनेक कंपन्यांकडे आहे. त्यात अत्याधुनिक सोयी-सुविधा आहे. हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात 11 वर्षांपूर्वी आले होते. या विमानाची किंमत जवळपास 248 दशलक्ष डॉलर म्हणजे 2,069 कोटी रुपये इतकी आहे.
