‘तुम्ही इंजिन बंद केले का?’, एअर इंडिया विमान अपघातातील कॉकपिटमधील संवाद आला समोर

अहमदाबादमधील विमान अपघाताची चौकशी दरम्यान विमानात वापरलेल्या इंधनाची तपासणी करण्यात आली. इंधन भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाऊसर आणि टाक्यांमधून घेतलेल्या इंधनाच्या नमुने तपासले. ते समाधानकारक आढळून आले.

तुम्ही इंजिन बंद केले का?, एअर इंडिया विमान अपघातातील कॉकपिटमधील संवाद आला समोर
| Updated on: Jul 12, 2025 | 9:11 AM

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल आला आहे. या अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर काही सेंकदात इंजिन अचानक बंद झाले. त्यामुळे विमान क्रॅश झाल्याचा प्राथमिक अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

नेमका काय झाला संवाद?

कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) मध्ये काय संवाद झाला त्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे, पायलट सुमीत सभरवाल यांनी कोपायलट कुंदर यांना विचारले, तुम्ही इंजिन बंद केले का? त्यानंतर कुंदर यांनी म्हटले, नाही, मी काहीच केले नाही. या संवादानंतर काही सेंकदात विमानाचा वेग कमी होऊ लागला आणि विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर क्रॅश झाले. या अहवालात कॉकपिटमधील झालेला शेवटच्या संवादातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

दोन्ही पायलटमधील या संवादामुळे या अपघातात मानवी चूक असण्याची शक्यता नाही. तसेच विमान उड्डाणानंतर काही क्षणातच सीसीटीव्हीमध्ये इमर्जन्सी पॉवर सप्लाय सिस्टम सक्रिय झाल्याचे दिसून आले. ही प्रणाली जेव्हा इंजिन बंद होते तेव्हाच सक्रीय होते.

इंधनाचे नमुने समाधानकारक

अहमदाबादमधील विमान अपघाताची चौकशी दरम्यान विमानात वापरलेल्या इंधनाची तपासणी करण्यात आली. इंधन भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाऊसर आणि टाक्यांमधून घेतलेल्या इंधनाच्या नमुने तपासले. या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर ते समाधानकारक आढळले. दोन्ही इंजिन ढिगाऱ्याच्या ठिकाणाहून काढण्यात आले आहे. आता हे इंजिन विमानतळावरील हँगरमध्ये बाजूला ठेवण्यात आले आहेत. चौकशी पथकाने काही महत्त्वाचे घटक ओळखले आहेत आणि पुढील तपासणीसाठी ते बाजूला ठेवले आहेत. तपासात पक्ष्यांच्या टक्करीचे कोणताही पुरावे मिळाला नाही, त्यामुळे पक्षीमुळे अपघात झाल्याची शक्यता नाही.

तपास पथकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडे कॉल साइनबद्दल चौकशी केली. त्यांनी सांगितले की एटीसीओला या प्रकरणात कोणतीही माहिती मिळाली नाही, परंतु त्यांनी विमानतळाच्या हद्दीबाहेर विमान अपघात पाहिला आणि आपत्कालीन प्रक्रिया सुरु केली.