Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर, उड्डाण करताच…

अहमदाबादमध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, त्यानंतर आता हा अपघात नेमका कसा घडला? या मागच्या कारणांचा शोध सुरू आहे. यादरम्यान अनेक नवे खुलासे समोर येत आहेत.

Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर, उड्डाण करताच...
Ahmedabad Plane Crash
| Updated on: Jun 18, 2025 | 7:34 PM

अहमदाबादमध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, त्यानंतर आता हा अपघात नेमका कसा घडला? या मागच्या कारणांचा शोध सुरू आहे. यादरम्यान अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान अपघाताच्या कारणांचा शोध घेणाऱ्या टीमला असं वाटत आहे की, जेव्हा हा अपघात घडला तेव्हा या विमानाची आपातकालीन पावर यंत्रणा (Emergency Power System) सुरू होती. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, जेव्हा हा विमान अपघात घडला तेव्हा उड्डाणा वेळीच विमानाचे दोन्ही इंजिन खराब होते का? की इतर काही तांत्रिक समस्या होती?

विमान अपघाताच्या कारणांचा शोधा घेणाऱ्या टीमच्या हवाल्यानं वॉल स्ट्रीट जर्नलने असं म्हटलं आहे की, या अपघातामध्ये तब्बल 270 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये विमानातील 242 प्रवाशांसह क्रू मेंबर आणि मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. विमान अपघाताच्या कारणांचा शोध सुरू असताना सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे? ती म्हणजे विमानानं उड्डाण केलं तेव्हापासूनच या विमानाची आपातकालीन पावर यंत्रणा सुरू होती. मात्र वाॉ स्टीट जर्नलच्या या रिपोर्टवर अद्याप बोइंगकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये.

काय असते इमरजेंसी पावर सिस्टीम?

प्रत्येक विमानाला एक इमरजेंसी पावर सिस्टीम असते, त्यालाच रॅम एअर टरबाइन RAT असं देखील म्हटलं जातं. ही पावर यंत्रणा विमानाच्या पंख्याच्या बरोबर खाली असते. ही यंत्रणा विमानाला जनरेट आणि बॅकअप देण्याचं काम करते. जेव्हा इंजिन काम करत नाही, अशा स्थितीमध्ये ही यंत्रणा सक्रिय होते. मात्र आता अशी माहिती समोर येत आहे की, ही यंत्रणा या विमानात आधीच सुरू होती, त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, आधीच या विमानाचे दोन्ही इंजिन बंद होते का? की दुसरी काही तांत्रिक समस्या होती?

अपघात नेमका कसा झाला?

या विमानानं लंडनला जाण्यासाठी अहमदाबादवरून उड्डान केलं होतं, मात्र त्यानंतर अवघ्या काही सेंकदामध्ये हे विमान वेगानं खाली येऊ लागलं आणि त्यानंतर हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं.